अग्रीम पिकविमा टप्पा दोनच्या वितरणाला सुरुवात, या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम जमा झाल्याचे मेसेज आले. Agrim Pik Vima 2023.

WhatsApp Group Join Now

Agrim Pik Vima 2023. महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते व त्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये नुकसान भरपाई चा निधी वितरित केला होता परंतु पडताळणी अपूर्ण असल्यामुळे काही शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आजच्या शासन निर्णयाद्वारे निधी जाहीर केला आहे.

अग्रीम पिक विमा टप्पा दोनला सुरुवात.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 11 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगाम 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व अग्रीम वितरणाच्या पहिल्या टप्प्यामधून वगळलेल्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यासाठी आज मान्यता देण्यात येत आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! दुष्काळ अनुदान 2023 चे पैसे आले ; फक्त हेच शेतकरी होणार अनुदानास पात्र..!

अग्रीम पिक विमा पहिला टप्पा संपन्न.

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये अतिवृष्टी, गारपीट व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तांचे नुकसान झाले होते. यांच्याच नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल केले होते त्या अंतर्गत राज्यातील 7 लाख 70 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांची नुकसान भरपाई पहिल्या टप्प्या अंतर्गत वितरित करण्यात आली होती.

अग्रीम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात.

Agrim Pik Vima 2023. अग्रीम पिक विमा वितरणाचा पहिला टप्पा संपन्न झाल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी पडताळणी पूर्ण झाली व आता या अंतर्गत राज्यामध्ये उर्वरित 1 लाख 11 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 76 कोटी 26 कोटी रुपये अग्रीन पिक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! चार वर्षे जुन्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे आले, बँकेचा मेसेज पहा..!

कृषी मंत्र्यांकडून अधिसूचना जाहीर.

राज्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनातन नुकसान झाले होते. यावेळेस सोयाबीन, कापूस या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाद्वारे पिक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. व याच नुकसान भरपाईसाठी पिक विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीक विम्याचे वितरण करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अधिसूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.

या जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना मिळणार हा अग्रीम पिक विमा.

खरीप हंगाम 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या फक्त बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दिवाळीपूर्वी 241 कोटी रुपये जमा करण्यात आले व आता दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 11 मार्चपासून उर्वरित पीक विम्याच्या अनुदानाचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.Agrim Pik Vima 2023.

Leave a Comment