राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर..! एप्रिल महिन्यामध्ये राशन दुकानात मिळणार मोफत या चार वस्तू. Anandacha Shida 2024

WhatsApp Group Join Now

Anandacha Shida 2024 राज्यातील शिधापत्रिकाधारक म्हणजे राशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात व देशात साजरा करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत या चार वस्तूंचे वितरण राशन दुकान मार्फत करण्यात येणार आहे.

राशन कार्डधारकांचा गुढीपाडवा होणार गोड.

दिनांक 11 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यामध्ये पुढील एप्रिल महिन्यामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे.

📢 हे पण वाचा :- बँकेचा मेसेज आला..! संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज 3000 पैसे जमा..!

फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार मोफत आनंदाचा शिधा.

Anandacha Shida 2024 राज्य शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्रधान्य कुटुंब तसेच अमरावती व छत्रपती संभाजीनगर या विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ( एपीएल ) म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिधाचे वाटप केले जाणार आहे.

या चार वस्तू मिळणार मोफत.

राज्य शासनाकडून या अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर सोयाबीनचे तेल या चार जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा अवघ्या शंभर रुपयांमध्ये वाटप केला जाणार आहे.

📢 हे पण वाचा :-सर्वात मोठी खुशखबर..! ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणार, शासन निर्णय आला..!

आनंदाचा शिधा योजनेची रूपरेखा.

महाराष्ट्र राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत च्या लाभार्थ्यांना, 1.37 कोटी प्रधान्य कुटुंब व 7.5 शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना असे एकूण राज्यातील सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना या आनंदाच्या शिधाचे वाटप केली जाणार आहे. व यासाठी राज्य शासनावर अतिरिक्त 550 कोटी 57 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.Anandacha Shida 2024.

Leave a Comment