Ashok chavan joins bjp अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश ; चव्हाण यांच्यावर पक्षाची मोठी जिम्मेदारी.

WhatsApp Group Join Now

Ashok chavan joins bjp महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून सतत राजकीय उलथापालत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील आमदार घेऊन महायुतीमध्ये प्रवेश घेतला व राज्याच्या सर्वोच्च म्हणजे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातील आमदारांसोबत शिवसेना व भाजप सोबत येऊन राज्याचे उपमुख्यमंत्री झाले व त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील काल काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

अशोक चव्हाण यांची कारकीर्द.

अशोक चव्हाण हे लोकसभेचे सदस्य राहिले आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर राज्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीचे सरकार आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते पदाचा कारभार सांभाळला होता. व सध्या अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते होते.Ashok chavan joins bjp.

हे पण वाचा :- सोन्याचे भाव घसरले ; सोने खरेदी करण्याची संधी चुकू नका..!
काँग्रेस पक्षाला दुसरा मोठा धक्का.

Ashok chavan joins bjp मागील काही महिन्यात काँग्रेसचे तीन मोठे नेते महायुती मध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दुसरे प्रमुख नेते बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला व त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

अशोक चव्हाण सोबत या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे नांदेडचे माजी आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य राहिलेले अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला. अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठी फूट पाहायला मिळाली.Ashok chavan joins bjp.

हे पण वाचा :- पी एम किसान योजनेच्या निकषांमध्ये बदल आता यांनाही मिळणार पुढील हप्त्यांचा लाभ..!
भाजपमध्ये चव्हाण यांच्यावर ही जिम्मेदारी.

Ashok chavan joins bjp महाराष्ट्र राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि लोकसभेमध्ये सदस्य राहिलेले अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यामुळे भाजप पक्षाला अधिक मजबुती प्राप्त झाली. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारले असता की भाजप पक्ष तुम्हाला कोणती जिम्मेदारी देऊ शकतो. यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले की “मी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अशी कोणतीच अट ठेवली नाही, किंवा तशी माझी अपेक्षा देखील नाही, भाजप पक्ष आणि पक्षश्रेष्ठीतील नेते जे काही भूमिका देतील ती मी अगदी निष्ठेने पार पाडण्यास तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.” ‌

Leave a Comment