शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बांबू लागवडीमुळे शेतकरी होणार मालामाल, बांबू लागवडीच्या अनुदानात वाढ. Atal Bambu Samruddhi Yojana.

WhatsApp Group Join Now

Atal Bambu Samruddhi Yojana.अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात आलेली शेती वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीमधून उत्पन्नाचा शाश्वत पर्याय निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीला प्रोत्साहन देत आहे. व शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी वाढीव दराने अनुदान देत आहे.

बांबू लागवडीसाठी च अनुदानात वाढ.

राज्यात बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली असून यामुळे राज्यात बाबू लागवडीस चालना मिळणार आहे. व बांबू शेती द्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्वत पर्याय निर्माण होणार आहे.Atal Bambu Samruddhi Yojana.

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

बांबू शेतीसाठी असे आहे वाढीव अनुदान.

अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत यापूर्वी एक हेक्टर क्षेत्रासाठी 600 टिशू कल्चर रोपे सवलतीच्या दरामध्ये दिली जात होती. आता महसूल व वन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार दोन हेक्टर साठी 1200 रोपांची लागवड व देखभालीसाठी प्रति रोपटे 175 रुपये अनुदान तीन वर्षांकरिता मिळणार आहे. यामुळे राज्यात बांबू शेतीचे क्षेत्र वाढणार आहे.

काय आहे अटल बांबू समृद्धी योजना.

अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे व या योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रति तीन वर्षासाठी 350 रुपये खर्च अपेक्षित आहे. व त्यापैकी 50% खर्च अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. बाबू लागवड करता शेतकऱ्यांना स्वतःच्या एकही रुपयाचा खर्च करण्याची गरज नसल्याने याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.Atal Bambu Samruddhi Yojana.

हे पण वाचा :- खुशखबर..! ज्येष्ठांना मिळणार 3000 महिना पगार , 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत..!

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ.

अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत खाजगी कंपनी, उत्पादक संस्था व बांबू शेतकऱ्यांचा समूह यातील प्रत्येक सभासदांना या योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच शेतकऱ्याला योजनेअंतर्गत वैयक्तिकरित्या देखील अर्ज करून बांबू लागवडीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येतो.

बांबू विक्रीसाठीच्या प्रमुख बाजारपेठा.

सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा, सांगली व आंध्र प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये बांबूच्या विक्रीसाठी बाजारपेठ आहे. आंध्र प्रदेशामध्ये प्रमुख्याने बांबूचे मोठी उलाढाल होत असते. व या अंतर्गत आंध्र प्रदेश मध्ये भरपूर साऱ्या वस्तू व साधने निर्माण केली जात आहे.

Leave a Comment