Ativrushti Anudan E-kyc शेतकऱ्यांनो ई-केवायसी करून घ्या ; ई-केवायसी मुळे तुमचे अनुदानाचे पैसे रखडले. पहा संपूर्ण यादी.

WhatsApp Group Join Now

Ativrushti Anudan E-kyc राज्यात गतवर्षी अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट व मोसमी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. व संबंधित शेतकऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाकडे नुकसान भरपाई साठी प्रस्ताव दाखल केले होते. व राज्य शासनाने या नुकसानीसाठी नुकसान भरपाईची मदत मंजूर केली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या ई केवायसी अपडेट नसल्यामुळे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.

ई-केवायसी अपडेट नसल्यामुळे पैसे जमा होण्यास अडथळा.

गतवर्षी झालेल्या स्वतःच्या पावसाच्या व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्यामुळे, त्यांची एक केवायसी अपूर्ण असल्यामुळे, बँक पासबुक व आधार कार्डच्या नावात बदल व चुकीचा आधार कार्ड क्रमांक दिला असल्यामुळे पैसे जमा करण्यास राज्य शासनाला अडथळा निर्माण होत आहे.Ativrushti Anudan E-kyc.

हे पण वाचा :- मार्च महिन्यापासून मिळणार मोफत वीज, लाईट बिल नाही ; मीटर काढली जाणार..!

या हंगामातील अनुदानाचे पैसे होत आहेत जमा.

राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती. पुढे मार्च 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. एप्रिल 2023 मध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला व त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये देखील अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान केले. या सर्व काळातील नुकसानी बद्दलचे दावे राज्य शासनाने मागवली होते, व या याद्या जिल्हा प्रशासनाकडून मागून घेऊन या काळातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात आहे.

केवळ आठच दिवसात उर्वरित अनुदान जमा होणार.

Ativrushti Anudan E-kyc राज्यात गतवर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी, ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना अनुदानाचे वाटप होऊ शकले नाही अशा बीड जिल्ह्यामधील 1 लाख 69 हजार 298 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केवळ आठच दिवसांमध्ये उर्वरित अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

कशाप्रकारे दुरुस्त होऊ शकते त्रुटी.

ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आली आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधायचा आहे. व त्यांच्यामार्फत आधार क्रमांक दुरुस्ती, आधार कार्ड व बँक पासबुक वरील नाव तपासून आवश्यक तो बदल करून घ्यावा तसेच बँक खात्याला आधार कार्ड देखील लिंक करून घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.Ativrushti Anudan E-kyc.

Leave a Comment