शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई झाली मंजूर.Ativrushti Nuksan Bharpai.

WhatsApp Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai राज्यात डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या काळामध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीट यामुळे राज्यातील भरपूर साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तांचे नुकसान झाले. याबद्दल राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव देखील दाखल केले होते.

आणि आता याच प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्य शासनाने या बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर केली आहे. तर मग या नुकसान भरपाई साठी कोणती जिल्हे पात्र असतील व शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम कधीपर्यंत खात्यात मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

नुकसान भरपाई वितरणाचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 4 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या रब्बी हंगामात डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता नुकसान भरपाई वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्याच्या रब्बी पिकाचे अतोनात नुकसान केले. व याच नुकसानीच्या भरपाईसाठी आज हा शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाने निधी जाहीर केला आहे.

📢 हे पण वाचा :- मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार..!

या जिल्ह्यातील नुकसान भरपाई चे प्रस्ताव मंजूर.

राज्यात मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानी करिता आयुक्तालय नाशिक व नागपूर यांच्यामार्फत राज्य शासनाला नुकसान भरपाई चे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. व हे प्रस्ताव राज्य शासनाने मान्य करून निधीच्या वितरणाला सुरुवात केली आहे.

सुधारित दराने नुकसान भरपाई चे होणार वाटप.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही 1 जानेवारी 2024 पासूनच्या सुधारित दराने वितरित केली जाणार आहे. ज्याअंतर्गत जिरायती क्षेत्राच्या नुकसान भरपाईसाठी 13500 तर बागायती क्षेत्राच्या नुकसान भरपाईसाठी 27 हजार रुपये या दराने दोन ऐवजी तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई चे वाटप केले जाणार आहे.

📢 हे पण वाचा :- दुष्काळग्रस्त 40 तालुक्यात उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश..!

नुकसान भरपाई वितरणासाठी मंजूर रक्कम.

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाने आज एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यास राज्य शासनाने आजच्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.

या नुकसान भरपाईसाठी फक्त हेच जिल्हे पात्र.
पात्र जिल्हा  बाधित क्षेत्र  बाधित शेतकरी संख्या  मंजूर निधि.
नाशिक  13.60 52 4.70
भंडारा  2183.89 5388 589.65
नागपुर  2656.34 4432 664.18
गोंदिया  0.0 0.0 1208.84
एकुण  4853.83 9872.00 2467.37

Leave a Comment