शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! चार वर्षे जुन्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे आले, बँकेचा मेसेज पहा. Ativrushti Nuksan Bharpai 2020

WhatsApp Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai 2020 शेतकरी मित्रांनो आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन थकित सर्व प्रकरणे मार्गी लागत आहे. जा अंतर्गत शेतकऱ्यांना मागील पिक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, अवकाळी पाऊस अनुदान व कर्जमाफी यांचे वितरण करण्यासाठी सरकारने शासन निर्णयांचा भडिमार लावला आहे. व यांपैकीच एक म्हणजे 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी बद्दल तब्बल चार वर्षांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

नुकसान भरपाई वितरणाचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 12 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक 3 जून 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातील हिरडा पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई वितरणास मान्यता देण्यात येत आहे.

📢 हे पण वाचा :- राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर..! एप्रिल महिन्यामध्ये राशन दुकानात मिळणार मोफत या चार वस्तू..!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

राज्यात अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला पुढील हंगामात उपयोगी यावे याकरिता एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य शासन निविष्ठा स्वरूपात नुकसान भरपाईच्या अनुदानाचे वितरण करत असते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या दोन तालुक्यामध्ये दिनांक 3 जून 2020 रोजी चक्रीवादळामुळे हिरडा पिकांचे अतोनात नुकसान झाले. व याबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव दाखल केले होते. व यांसाठी कालच्या शासन निर्णयानुसार नुसार भरपाई वितरणास मान्यता देण्यात आली आहे.Ativrushti Nuksan Bharpai 2020.

📢 हे पण वाचा :- बँकेचा मेसेज आला..! संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज 3000 पैसे जमा..!

नुकसान भरपाई चे प्रस्ताव मंजूर.

दिनांक 3 जून 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या 7066.69 क्विंटल हिरडा पिकांचे नुकसान झाले. तसेच या चक्रीवादळामुळे हिरडा पिके शेतात व बांधावर विखुरल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र निश्चित करणे शक्य नव्हते आणि यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून यांना मदत देण्यात येत नव्हती परंतु आता हे सर्व प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केले आहेत.

अनुदानास पात्र शेतकरी व त्यांच्यासाठी मंजूर निधी.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव या तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्याच्या 7066 क्विंटल हिरडा पिकाच्या नुकसान भरपाई करिता 3865 शेतकऱ्यांना 15 कोटी 48 लाख 28 हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.Ativrushti Nuksan Bharpai 2020.

Leave a Comment