Ativrushti nuksan bharpai :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2109 कोटी निधी वितरणास मंजुरी.

WhatsApp Group Join Now

Ativrushti nuksan bharpai :- शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवेळी पाऊस व दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जाऊन शेती करावी लागते. आणि अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती करण्यास व पिकांच्या उत्पन्नात देखील मोठी घट निर्माण होते तसेच सध्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्याला म्हणावं तसा मोबदला मिळत नाही आणि त्यामुळेच शेतकरी नुकसान भरपाईची आणि पीक विम्याची मागणी करतात. आणि याच मागणीला अनुसरून राज्य सरकारने राज्यातील या काही विशिष्ट जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवेळी पाऊस नुकसान भरपाईसाठी 1109 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे आणि हा निधी देखील अवघ्या काही दिवसांमध्ये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

2023 ची नुकसान भरपाई जाहीर :- ( Ativrushti nuksan bharpai )

राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने २१०९,१२२००० (दोन हजार नऊशे एक कोटी बारा लाख दोन हजार) रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. व त्यासाठी मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक शासन निर्णय निर्गमित करून या निधी वितरणाला मंजुरी दिली असल्याचे स्वतः या विभागाचे मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांना विहित दरामध्ये मदतीचे वाटप :-

राज्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ व पूर परिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दरामध्ये निविष्ठा अनुदानाचे वितरण करण्यात येत असते. ( Ativrushti nuksan bharpai )

हे ही वाचा :- पि एम किसान व नमो शेतकरी योजनांचे हाप्ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार.

दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत :- ( Ativrushti nuksan bharpai )

तसेच राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट व त्यानंतर पुढील कालावधीमध्ये देखील आवेळी पाऊस गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. व या नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत सुधारित दराने मदत देणार असल्याची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर मधील हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती.

अवघ्या आठ दिवसातच खात्यामध्ये अनुदान :- ( Ativrushti nuksan bharpai )

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कोकण, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर व पुणे त्यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झाले होते. या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्याकरिता राज्य शासनाने निधी वितरणास मान्यता देखील दिली आहे. या निधीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये वितरण देखील करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :- भुजबळांकडून ओबीसींच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा.

मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन :- ( Ativrushti nuksan bharpai )

तसेच गेल्या वर्षी नाशिक विभागातील अवकाळी पाऊस पूरपरिस्थिती चक्रीवादळ आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी 10 जानेवारी रोजी 144 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देऊन हा देखील निधी अवघ्या काही दिवसांमध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment