शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्यातील 26 जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण सुरू, तुमचे बँक खाते. Ativrusthi Anudan 2020-2022.

WhatsApp Group Join Now

Ativrusthi Anudan 2020-2022.राज्यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, गारपीट व अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांसाठी व मालमत्तेंसाठी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाने याआधी एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला होता. आता राज्य शासनाने आज एक शुद्धिपत्रक काढून या शासन निर्णयामध्ये बदल केला आहे व निधीमध्ये वाढ केली आहे. तर मग आता किती निधी वाढला आहे व ही नुकसान भरपाई कोणत्या 26 जिल्ह्यांना मिळणार आजच्या या लेखात जाणून घेऊया.

अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यामध्ये सन 2020 ते 22 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या व मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी निधी वितरित करण्याबाबत शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.Ativrusthi Anudan 2020-2022.

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

नुकसान भरपाई वितरणाचे शुद्धिपत्रक.

राज्यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या व मालमत्तेच्या भरपाईसाठी राज्य शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती, त्याऐवजी आता 112 कोटी 39 लाख 21 हजार रुपये एवढ्या निधीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार ही नुकसान भरपाई.

सण 2020 ते 2022 या कालावधीमध्ये शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई असेल, तसेच या कालावधीमध्ये शेतजमीन खरडून जाणे व शेती मालमत्ता ज्यामध्ये घराची पडझड, पाळीव प्राण्यांच मृत्यू , दुकान टपरी यांचे नुकसान अशा प्रकारच्या कोणत्याही नुकसानीसाठी राज्य सरकारकडून या शासन निर्णय द्वारे मदतीचे वितरण करणे मध्ये येणार आहे.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर.

या 26 जिल्ह्यांमधील बाधितांना मिळणार मदत.

कोकण विभागामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर तसेच भंडारा, मुंबई उपनगर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व नाशिक विभागातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.Ativrusthi Anudan 2020-2022.

Leave a Comment