शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! गारपीट व अतिवृष्टी नुकसानीचे पैसे आले ; आजपासून खात्यावर जमा होणार. Ativrusthi Anudan 2023.

WhatsApp Group Join Now

Ativrusthi Anudan 2023.राज्यामध्ये 2023 24 या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ व अवकाळी पाऊस यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत व त्याप्रमाणे राज्यामध्ये नुकसान भरपाई चे वितरण सुरू झाले आहे. आचारसंहिते अगोदर मार्गी लागलेले किंवा शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरणास परवानगी दिलेले सर्व दावे आचारसंहितेमध्ये देखील पूर्ण होऊ शकतात त्यामुळेच हे नुकसान भरपाई देखील आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत.

राज्य सरकारच्या सुधारित धोरणानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्याची घोषणा केली असून, शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.Ativrusthi Anudan 2023.

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

किती व कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर.

नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने सोनपेठ तालुक्यामधील 52 गावांमधील 7 हजार 806 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधित शेतकऱ्यांसाठी 13 हजार 600 प्रमाणे जिरायती क्षेत्रासाठी 10 कोटी 63 लाख 22 हजार 400 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या याद्या झाल्या अपलोड.

सोनपेठ तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित चार महसूल मंडळातील 52 गावांपैकी आतापर्यंत 44 गावातील 19 हजार 296 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून, त्यांना त्यांचा वीके नंबर प्राप्त झाल्यानंतर त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील याद्या महा आयटी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असून त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर.

आचारसंहिता दरम्यान कसे मिळेल अतिवृष्टी अनुदान.

देशामध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. व राज्यातील शेतकऱ्यांना सध्या मंजूर झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास यामुळे अडचण निर्माण होईल का? किंवा हे अनुदान आचारसंहितेमध्ये मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. Ativrusthi Anudan 2023.

तर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मंजूर करण्यात आलेले व शासन निर्णय निर्गमित केलेले सर्व दावे या आचारसंहितेदरम्यान मान्य असून त्याचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतो त्यामुळे हे नुकसान भरपाईचे अनुदान देखील राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये वितरित केले जाणार आहे.

Leave a Comment