राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान मंजूर ; शासन निर्णय आला व तात्काळ अनुदान ही जमा. Ativrusthi nuksan bharpai 2020-22.

Ativrusthi nuksan bharpai 2020-22.राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या व शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध् निधी जमा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

नुकसान भरपाई वितरणाचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये सण 2020 ते 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे व इतर कोणत्याही मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी बाधितांना मदत वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.Ativrusthi nuksan bharpai 2020-22.

निधीच्या वाढीसाठी नवीन शुद्धपत्रक.

राज्यामध्ये 2020 ते 2022 या कालावधीमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे, पशुधनाचे व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते व यासाठी 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाने या बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरणास परवानगी दिली होती. आता या शासन निर्णयात बदल करून निधीमध्ये वाढ केली आहे व नवीन शासन निर्णयानुसार अतिरिक्त निधी या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

कोकणातील या जिल्ह्यांना मिळणार भरपाईचे अनुदान.

कोकण विभागामध्ये जानेवारी 2021, मे 2021, जून ते ऑक्टोबर 2020, जानेवारी 2022, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021, ऑक्टोबर 2022, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021, ऑक्टोबर 2022, जुलै 2021 ते जून 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानी बाबत राज्य शासनाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुसंगाने रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 58 लाख 60 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

नागपूर विभागातील या जिल्ह्यांना भरपाईचे अनुदान.

नागपूर विभागामध्ये झालेल्या जून ते ऑगस्ट 2022, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, जून ते ऑक्टोबर 2022, जुलै ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपुर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 37 कोटी 90 लाख 23 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

नाशिक विभागासाठी एवढा निधी मंजूर.

नाशिक विभागामध्ये सन 2020 ते सन 2022 च्या कालावधीमध्ये अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यांसारख्या कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे, पशुधनाचे व इतर कोणत्याही मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 36 लाख 7 हजार रुपये वितरित करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

मराठवाड्यातील या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर.

मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यामधील सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 10 कोटी 98 लाख  रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.Ativrusthi nuksan bharpai 2020-22.

Leave a Comment