खुशखबर..! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर, तात्काळ बँक खात्यात जमा होणार. Ativrusthi nuksan bharpai 2023.

WhatsApp Group Join Now

Ativrusthi nuksan bharpai 2023.राज्यातील शेतकऱ्यांचे मागील काळामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान झाले होते. व या नुकसानीसाठी राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात आले. परंतु या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई चे वितरण करण्यास राज्य शासनने सुरुवात केली आहे. अशाच एका वंचित जिल्ह्यासाठी राज्य शासनाने सव्वातीन कोटी रुपये मंजूर केले असून ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत.

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या काळामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भेट भागासह पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. व याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करून 3 कोटी 22 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.Ativrusthi nuksan bharpai 2023.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर..!

हे काम तात्काळ करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.

शिरूर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांची ही केवायसी पूर्ण करून घ्यावी. तेव्हाच या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाने मंजूर केलेली रक्कम जमा होईल अशा प्रकारचे आवाहन शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा.

शिरूर तालुक्यामध्ये डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भाजीपाला भाजीपाला व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अगदी तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला गेला यामुळे शेतकरी त्रस्त झाले असताना राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अशी आहे पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी.

शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार शिरूर तालुक्यामध्ये 2 हजार 707 बाधित शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 22 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून, तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम तात्काळ जमा देखील करण्यात येणार आहे.Ativrusthi nuksan bharpai 2023.

Leave a Comment