आचारसंहितेमध्ये जमा होणार दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळीचे अनुदान ; शेतकऱ्यांना तात्काळ हे काम पूर्ण करण्याचे आवाहन. Ativrusthi Nuksan Bharpai E-KYC.

WhatsApp Group Join Now

Ativrusthi Nuksan Bharpai E-KYC.राज्यामध्ये 2021, 2022 व 2023 या तीन वर्षाच्या काळामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, चक्रीवादळ व गारपीट यांसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी थकीत असलेल्या किंवा मंजूर केलेल्या अनुदानाचे वितरण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. व तशा प्रकारची हालचाल देखील सुरू झाली असून राज्यातील या एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

बाधित शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा.

राज्य सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ व दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाच्या वितरणाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली जाणार आहे किंवा सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून सतत विचारणा केली जात होती की सरकारने या अनुदानासंदर्भात शासन निर्णयावर शासन निर्णय जाहीर केले परंतु ही अनुदान खरेच मिळेल का? मिळेल तर केव्हा मिळेल? यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील?

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

यावर्षीपासूनच्या नुकसान भरपाई सठी मिळणार मदत.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून 2021 पासून दाखल केलेले प्रस्ताव जे की राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले होते परंतु कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणास्तव या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले गेले नाही, आता हे सर्व प्रस्ताव मार्गी लावून राज्य शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यास सुरुवात केली आहे.

कोण कोणत्या काळातील नुकसानग्रस्तांना मिळणार मदत.

१) कोकणामध्ये 2021 मध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्याचे अनुदान वितरण करणे बाकी होते ते आता वितरित करण्यात येणार आहे.
२) अमरावती विभागामध्ये 2021 व 2022 या वर्षांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण बाकी होते त्याचे वितरण देखील आता करण्यात येणार आहे.
३) जुलै 2023 मध्ये नांदेड जिल्हा व आसपास या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 400 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता परंतु याचे वितरण बाकी होते. हे अनुदान देखील आता जमा होणार आहे.
४) डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट व चक्रीवादळामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी नुकसान भरपाई मिळणार.
५) राज्यात 9 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये नऊ ते दहा जिल्ह्यांसाठी अवकाळी पाऊस व गारपीटीचे अनुदान मंजूर करण्यात आले होते त्याचे देखील वितरण आता होणार आहे.Ativrusthi Nuksan Bharpai E-KYC.
६) विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता तो देखील आता वितरित होणार आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर.

राज्य सरकारकडून 2019 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तलाठ्याच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे झाले, शेतकऱ्यांच्या याद्या बनवल्या, शेतकऱ्यांचे आधार कार्ड घेऊन लिंक केले, सरकारकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले, हे प्रस्ताव सरकारकडून मंजूर देखील झाले व त्यानंतर अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बनवल्या परंतु सरकारकडून शासन निर्णय वितरित करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचे पैसे जमा झाले नाही.

शेतकऱ्यांना अनुदानासाठी तात्काळ ही कामे पूर्ण करून घेण्याचे आवाहन.

सरकारकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निधी वाटपाचे व अनुदान वितरणाचे प्रस्ताव हे थकीत ठेवले जातात. त्यामुळेच आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे थकित नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याला वितरित केले जाणार आहे.
कारण की एखाद्या वाटपाला शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरणात मंजुरी दिली असल्यास आचारसंहिते मध्ये देखील तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो.  Ativrusthi Nuksan Bharpai E-KYC.
 त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ त्यांची इ-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तसेच काहींच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तेही काम तात्काळ शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यायचे आहे.

Leave a Comment