शेतकऱ्यांची चिंता वाढणार, राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ; या जिल्ह्यांना येलो अलर्ट. Avkali paus alert.

WhatsApp Group Join Now

Avkali paus alert. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मागील महिन्याभरापासून तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. रब्बी हंगामातील पिके काढणीला आली असताना अवकाळी पावसाने हलदी लावल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. व आता पुन्हा एकदा पुढल्या दोन दिवस राज्यामधील काही तुरळक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे उकाडा वाढला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटी जोर देखील कायम आहे. आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर उर्वरित राज्य मध्ये ढगाळ हवामानाचा उन्हाचा चटका कायम राहील.Avkali paus alert.

राज्यात कमी दाबाचा पट्टा आहे सक्रिय.

समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर विदर्भ आणि परिसरावर चक्रीकार वारे वेगाने वाहत आहेत. या चक्रीकार वाऱ्याच्या प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जणांना अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे.

या जिल्ह्यांना अवकाळीचा ऑरेंज अलर्ट.

रविवार 17 मार्चपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजरी लावलेली असताना नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर दाजी यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्याचा मराठवाड्यातील पूर्वीय काही जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना अवकाळीचा येल्लो अलर्ट.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जारी केला असुन बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा व गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जाहीर केला आहे आणि मराठवाड्यातील लातूर व नांदेड या दोन जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे.Avkali paus alert.

Leave a Comment