खुशखबर..! या जिल्ह्याला अवकाळी मदतीसाठी 206 कोटी रुपये मंजूर, तुमचे बँक खाते तपासा. कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा Avkali Paus Anudan 2024

WhatsApp Group Join Now

Avkali Paus Anudan 2024 राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस चक्रीवादळ व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व मालपत्त्याचे अतोनात नुकसान झाले. व नुकसानीचे शेतकऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केले होते व नुकसान भरपाईची मागणी केली होती.

आणि आज या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई साठी आज एक शासन निर्णय निर्गमित करून 206 कोटी रुपये मंजूर केले आहेत व पुढील दोन दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे कृषी मंत्री यांनी आश्वासन दिले आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी ची मदत.

राज्यात गतवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या जिल्ह्यांपैकी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने 1 लाख 48 हजार 368 हेक्टर वरील बाधित क्षेत्रावरील शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 206 कोटी रुपये आज जाहीर केले आहेत.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बाजारात कापसाची मागणी वाढली, पहा आजचे कापुस बाजारभाव..!

बँक खात्यात प्रत्यक्ष अनुदान जमा होण्यास सुरुवात.

Avkali Paus Anudan 2024 संभाजीनगर जिल्ह्यातील गतवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 1 लाख 48 हजार 368 हेक्टर वरील क्षेत्राच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या 206 कोटी रुपयांचा निधी संभाजीनगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. व हा मंजूर निधी जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार 194 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष जमा होण्यास आज सुरुवात झाली आहे.

खरीपासह रब्बीच्या नुकसान भरपाई चे वितरण.

गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटी काढणीला आलेले पिके व रब्बी हंगामातील कोवळी पिके यांचे अवकाळी पावसामुळे 1 लाख 48 हजार 368.34 हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव राज्य शासनाला दाखल करण्यात आला होता. व या नुकसान भरपाईसाठी 2 लाख 64 हजार 194 शेतकऱ्यांसाठी 20 जानेवारी रोजी 206 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा..!

नुकसान भरपाईसाठी सुधारित दराने मदत.

Avkali Paus Anudan 2024 व या नुकसान भरपाईसाठी राज्यशासनाने 1 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाईची मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या नवीन निकषानुसार जिरायत, बागायत व फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अनुक्रमे 13 हजार 600, 27 हजार व 36 हजार प्रति हेक्टर नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होणार आहे.

मराठवाड्यातील बाधित जिल्ह्यांसाठी देखील मदत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई पोटी 9 लाख 67 हजार 561 बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने 709 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार सरसकट नुकसान भरपाई.

राज्य शासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले व राज्य शासनाने निधी मंजुरीच्या आदेशानंतर नुकसान भरपाई पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तालुका प्रशासनाकडे अपलोड करण्यामध्ये येत असतात. व शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. शेतकऱ्यांनी त्यानंतर तात्काळ आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे व त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे अनुदान जमा होते.Avkali Paus Anudan 2024.

 

Leave a Comment