Avkali Paus Nuksan Bharpai शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा.

WhatsApp Group Join Now

Avkali Paus Nuksan Bharpai राज्यामध्ये डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस गारपीट चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या भरपाईसाठी राज्य सरकारने याआधी देखील एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला आहे. व आज पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या शेतकऱ्यांसाठी उर्वरित निधीची घोषणा केली आहे.

अवकाळी नुकसान भरपाई साठी पुन्हा एकदा मदत.

Avkali Paus Nuksan Bharpai महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 7 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 24 कोटी 67 लाख 37 हजार निधी वितरण करण्यास मान्यता दिली आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! आजच्या शासन निर्णयानुसार आता घरेलू कामगारांना 10000 रुपये अनुदान, लगेचच अर्ज करा..!

मंत्री अनिल पाटील यांची शेतकऱ्यांसाठी घोषणा.

Avkali Paus Nuksan Bharpai मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज अशी घोषणा केली की राज्यात डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्राप्त प्रस्तावानुसार राज्य शासनाने ही मदत वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

सुधारित दराने मिळणार नुकसान भरपाई.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता राज्य सरकार निविष्ठा स्वरूपामध्ये नुकसान भरपाईचे वितरण करते. व राज्य शासनाच्या नवीन सुधारित दराने आता दोन ऐवजी तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! आता घरेलु कामगारांना सुद्धा मिळणार भांडी संच व 5000 रुपये अनुदान..!

कोणत्या शेतकऱ्यांना आणि कधी मिळणार नुकसान भरपाई.

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचे ज्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते व नुकसान भरपाईची मागणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये राज्य शासनाने मंजूर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.Avkali Paus Nuksan Bharpai.

Leave a Comment