Bambu lagwad anudan yojana बांबू लागवडीसाठी मिळणार ७ लाख रु.अनुदान ; पहा सविस्तर माहिती.

WhatsApp Group Join Now

Bambu lagwad anudan yojana देशात पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि यावर पर्याय म्हणून केंद्र व राज्य सरकार बांबू लागवडीला प्रोत्साहन देत आहे. बांबू हा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व इथेनॉल निर्मितीसाठी फायद्याची ठरत आहे आणि ही शेती करण्यासाठी आता शेतकऱ्यांना सात लाख रुपये पर्यंतचे अनुदान देखील देण्यात येणार आहे तर मग कशाप्रकारे या अनुदानाचा लाभ तुम्हाला मिळेल आणि बाबू शेती बद्दलची सविस्तर माहिती आज या लेखात जाणून घेऊया.

काय आहे ही योजना.

राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना बांबू शेती करण्याचे फायदे आणि यामुळे पर्यावरण सुरक्षितेसाठी मोठा हातभार लागणार आहे. राज्यात बांबू शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना सात लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते.Bambu lagwad anudan yojana.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!

योजनेअंतर्गत समाविष्ट जिल्हे.

या योजने अंतर्गत याआधी लातूर आणि सातारा या दोनच जिल्ह्यांचा समावेश होता परंतु योजनेसाठी शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा या अंतर्गत समावेश केला तसेच नांदेड जिल्ह्यातील बाबू लागवडीस प्रोत्साहन मिळत आहे.

बांबू शेती करण्याचे फायदे. ( Bambu lagwad anudan yojana )

बांबू हा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व इथेनॉल निर्मितीसाठी अत्यंत फायद्याचा ठरतो.

त्यामुळेच भारत सरकारने नेदरलँड आणि फिनलँड च्या मदतीने आसाम मधील नुमालीगड येथे बांबू पासून इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे.

बांबू पासून फर्निचर, कापड व बांबू ब्रश यांसारख्या अठराशे पेक्षा जास्त नैसर्गिक वस्तूंची निर्मिती करता येते.

बांबूपासून इथेनॉल निर्मिती केल्यास देशाचा डिझेल पेट्रोलवर होत असलेला खर्च कमी होईल.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाने झोडपले ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी..!
बाबू शेती करण्याची कार्यपद्धती.

मनरेगा योजने अंतर्गत आता बाबू शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

योजने अंतर्गत बांबू शेतीला प्रति हेक्टर सात लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.

आणि जर तुम्हाला बांबू शेती किंवा बांबू लागवड करायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांचा ग्रुप करून गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्यामार्फत ठराव मंजूर करून घेऊन पंचायत समितीच्या BDO अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

व BDO अधिकाऱ्याची सहमती होऊन शासनाने नियुक्त केलेल्या रोपवाटिके अंतर्गत सहमती पत्र सादर करायचे आहे व त्या रोपवाटिके कडून शेतकऱ्याला विनामूल्य बांबूची रोपे देण्यात येतील.

शासनामार्फत थेट या रोपवाटिका धारकांच्या खात्यामध्ये योजनेच्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे.Bambu lagwad anudan yojana.

Leave a Comment