Bandhkam kamgar yojna राज्यातील कामगारांना कामगार पेटी व गृह उपयोगी वस्तूंचे वाटप .

WhatsApp Group Join Now

Bandhkam kamgar yojna राज्यातील कामगारांना कामासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांची पेटी तसेच ग्रह उपयोगी सामान राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे आणि यासाठी राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली आहे. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असतील याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे हि योजना.

Bandhkam kamgar yojna राज्य शासनाने राज्यातील कामगारांसाठी गृह उपयोगी वस्तू संच योजना सुरू केली आहे व या योजनेअंतर्गत कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे, तसेच बांधकाम कामासाठी खूप उपयोगात येणाऱ्या वस्तूंची पेटी सुद्धा मिळत आहे, या पेट्या तुमच्या पैकी बऱ्याच लोकांना मिळाल्या सुद्धा असतील,

हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज ; केंद्र सरकारची नवीन योजना..!

कारण सध्या बांधकाम कामगार योजनेचा म्हणजेच गृहउपयोगी वस्तूंचा लाभ तसेच या पेट्या लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत, या वस्तु तसेच पेटी या योजनेंतर्गत मोफत मिळणार आहे, या वस्तु तसेच ही पेटी घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, या गृहउपयोगी संचा मध्ये वेगवेगळ्याप्रकारच्या 17 वस्तु असतात व या वस्तूंचे 30 नग असतात.Bandhkam kamgar yojna.

योजनेच्या शर्ती व अटी.

जो कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत असलेला कामगार योजनेस पात्र राहील.
योजनेस इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे भरून दिल्यानंतर ग्रह उपयोगी संच पुरवण्यात येईल.
इच्छुक लाभार्थ्यांना योजनेतील संचाचे वितरण करतेवेळी लाभार्थ्याचा फोटो काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने हाताचे ठसे घेणे अनिवार्य राहील. Bandhkam kamgar yojna.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तू .

अ .क्र गृह उपयोगी संचातिल वस्तू नग
१. ताट ०४
२. वाट्या ०८
३. पाण्याचे ग्लास ०४
४. पातेले ०१
५. पातेले झाकणासह ०१
६. पातेले झाकणासह ( भाजीचा ) ०१
७. मोठा चमचा ०१
८. मोठा चमचा ( भाजीचा ) ०१
९. पाण्याचा जग ०१
१०. मसाला डबा ०१
११. डब्बा झाकणासह ( १४ इंच ) ०१
१२. डब्बा झाकणासह ( १६ इंच ) ०१
१३. डब्बा झाकणासह ( १८ इंच ) ०१
१४. परात ०१
१५. प्रेशर कुकर ०१
१६. कढाई ( स्टीलची ) ०१
१७. स्टीलची टाकी ०१
  एकुण ३०

 

Leave a Comment