शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत मिळणार सोयाबीन व कापसासाठी अनुदान. Bhavantar Bharpai Yojana

Bhavantar Bharpai Yojana देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिनांक 16 मार्च 2024 शनिवार रोजी एक तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेतली व या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री यांनी राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजनेअंतर्गत 4 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. तर मग नेमकी काय आहे ही भावांतर योजना व या योजनेअंतर्गत सहा मंजूर निधी शेतकऱ्यांना केव्हा व कशाप्रकारे मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

मुख्यमंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा.

WhatsApp Group Join Now

देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमध्ये सरकारला कोणतेच काम करता येत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. या अंतर्गत राज्यामध्ये प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.Bhavantar Bharpai Yojana

हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापसाला मिळतोय 8000 रुपयांच्या वर भाव, पहा आजचे कापुस बाजार भाव..!

काय आहे ही भावांतर योजना.

शेतकऱ्याचा शेतीमाल विक्रीस आल्यानंतर बाजार समितीमध्ये या शेतीमालाचे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असेल किंवा या ज्या पिकाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला असेल तर हमीभाव आणि शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या दरामधील तुटीचे अंतर भरून काढण्यासाठी सरकारकडून या पिकाला अनुदान दिले जाते.
नुकत्याच काय दिवसापूर्वी मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेश मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण केले आहे. व याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी या भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.

कशाप्रकारे मिळेल भावांतर योजनेअंतर्गत अनुदान.

भावांतर योजनेअंतर्गत पिकाला देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी विविध बाबी लक्षात घेऊन या अनुदानाची वितरण केले जाते. जसे की मागील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये कांदा या पिकासाठी अनुदान घोषित केल्यानंतर कांदा पिकाची ईपिक पाहणी, कांदा विक्रीच्या पावत्या या सर्व बाबींच्या आधारावर कांद्याचे अनुदान वितरित केले होते.
परंतु राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही खेडेपाड्यातील खाजगी आडत्यांकडे विक्री केले असल्यामुळे या शेतकऱ्यांकडे कोणतीच पावती किंवा बिल उपस्थित नसेल तसेच भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर या सोयाबीन आणि कापूस या पिकांची नोंद देखील नसेल त्यामुळे आता नेमके कोणत्या आधारावर हे अनुदान शेतकऱ्याला दिले जाते हे विशेष पाहण्यासारखे असणार आहे.

कधीपर्यंत मिळू शकते हे अनुदान.

शिंदे फडणवीस पवार सरकारने त्यांच्या शेवटच्या कार्य काळामध्ये या भावांतर योजनेअंतर्गत च्या अनुदानाची घोषणा केली असली तरी जून 2024 पर्यंत हे अनुदान शेतकऱ्याला मिळणे मुश्कील आहे. तसेच जून नंतर नवीन सरकार द्वारे या भावांतर योजनेचा शासन निर्णय काढून पुन्हाच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकते.Bhavantar Bharpai Yojana

Leave a Comment