binvyaji karj yojana नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ; बिनव्याजी कर्ज योजना जाहिर.

WhatsApp Group Join Now

binvyaji karj yojana शेतकरी मित्रांनो राज्यातील विहित मुदतीमध्ये आपल्या अल्प मुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार द्वारे एक शासन निर्णय निर्गमित करून यांच्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना बिनव्याजी 108 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच यासाठी पात्रता आणि अटी काय असतील याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज योजनेची घोषणा.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत 9 फेब्रुवारी 2024 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अर्थातच बिनव्याजी कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

शासन निर्णयाची सविस्तर माहिती.

9 फेब्रुवारी 2024 रोजी पासून महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यासाठी 108 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व्याजदरामध्ये वसुलीशी निगडित प्रोत्साहन पर अनुदानाच्या स्वरूपात सवलत देण्याकरिता राज्य शासनाच्या मार्फत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जात आहे.

व्याज सवलत योजनेची कार्यपद्धती.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे नियमित व विहित मुदतीमध्ये परतफेड केल्यास या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना 1 एप्रिल 1990 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ज्वारी करणार मालामाल ; ज्वारीला सध्या 4000 रुपयांच्या वर भाव..!

अनुदान वाटपाची रूपरेखा.

मात्र या योजनेअंतर्गत थकीत कर्जदार किंवा मध्यम सवलत कर्ज व दीर्घ मुदत कर्जदारांसाठी लागू होत नाही.
या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर तीन टक्के व्याजदर सवलत तर तीन लाखांपेक्षा अधिकच्या पीक कर्जांवर एक टक्का व्याज सवलत देण्यात येते. तसेच जर शेतकऱ्यांनी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केल्यास या शेतकऱ्याला राज्य शासनामार्फत तीन टक्के व्याजदर सोलर व केंद्र शासनामार्फत चार टक्के व्याजदर सवलत देऊन हे कर्ज माफ करण्यात येते.म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने दिले जातात आणि याच्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेत पत्रतेचे निकष .

या वर्षाकरिता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 360 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीचे वितरण देखील करण्यात आले आहे.
व आता पुन्हा एकदा नियोजन व वित्त विभागाच्या माध्यमातून 108 कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
त्यामुळेच 30 जून पर्यंत संपूर्ण पीक कर्जाची परतफेड केली जाईल अशा अल्पमुदत पीक कर्ज धारक शेतकऱ्यांचे पूर्ण व्याज माफ केले जाईल व ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
तसेच जर बँकांमार्फत या योजनेअंतर्गत चे व्याज माफ करण्यास किंवा इतर कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना अडचण निर्माण केल्यास आपल्या जवळच्या उपनिबंधक कार्यालय मध्ये तक्रार नोंदवू शकता.

 

Leave a Comment