Borewell Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! बोरवेलसाठी मिळणार ४०००० रुपयांपेक्षा जास्त अनुदान.

WhatsApp Group Join Now

Borewell Anudan Yojana राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ व दुष्काळ यांसारख्या संकटांचा सामना करत शेती करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पर्याप्त पाणी उपलब्ध व्हावे याकरता राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत मागील त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर तसेच सौर कृषी पंप व पाईपलाईन यासारख्या योजनांचा लाभ देत आहे.

यात सिंचनाच्या योजनेत भर घालणारी एक नवीन योजना म्हणजे बोरवेल अनुदान योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना बोरवेल साठी 40 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तर मग यासाठी अर्ज कसा करायचा, योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र असतील व योजनेअंतर्गत अनुदान वितरणाची कार्यपद्धती काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी नवीन सिंचन योजना.

Borewell Anudan Yojana राज्यात दिवसेंदिवस पाणी पातळी खाली जात आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शंभर ते दीडशे फुटावर लागणारे पाणी सध्या तीनशे फुटाच्या खाली सरकले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर या योजनेचा जास्त लाभ मिळत नाही. म्हणूनच बोरवेल अनुदान योजनेअंतर्गत तीनशे फुटापेक्षा जास्त बोरवेल घेऊन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे ८० % अनुदान खात्यात जमा होण्यास सुरवात..!

काय आहे बोरवेल अनुदान योजना.

राज्यातील शेतकऱ्यांना एक वेळेस बोरवेल घेण्यासाठी प्रति शेतकरी प्रति लाभार्थी 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ज्यामध्ये बोरवेल साठी 25 हजार रुपये तर विद्युत पंपासाठी 15 हजार रुपये असे एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येत आहे.

बोरवेल योजनेसाठीची पात्रता.

बोरवेल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा स्थायी नागरिक असायला हवा. लाभार्थ्याकडे आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, आठ अ उतारा, रहिवासी प्रमाणपत्र व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे असायला हवीत.Borewell Anudan Yojana.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट..!

असा करावा लागेल योजनेसाठी अर्ज.

बोरवेल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्याला https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर वरील सर्व अधिकृत कागदपत्रांसोबत अर्ज सादर करायचा आहे. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून पात्र अपात्र ठरवले जाईल व योजनेअंतर्गतच्या अनुदानाचे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरण केले जाईल.Borewell Anudan Yojana.

Leave a Comment