Cabinet Decision Maharashtra आजचे मंत्रिमंडळ निर्णय ; धान बोनस जाहीर,अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुर,नमोचा हाफ्ता आला.

WhatsApp Group Join Now

Cabinet Decision Maharashtra काल म्हणजे 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाची एक महत्त्वपूर्ण अशी मंत्रिमंडळ बैठक पार पडली व या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. जसे की धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना मदत व नमोच्या पुढील हाप्त्याच्या वितरणाची घोषणा असे निर्णय घेण्यात आले,तर मग या घोषणा बरोबर सरकारने इतर कोणत्या घोषणा केल्या आहेत आजच्या या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर.

खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति एक तरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. खरीप हंगामातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारला 1600 रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल.Cabinet Decision Maharashtra.

हे पण वाचा :- अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार..!

इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या धनगर विद्यार्थ्यांची संख्या वाढवली.

Cabinet Decision Maharashtra धनगर समाजातील 5000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येते. व आता या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी घेतला. आता या विद्यार्थ्यांची संख्या 5000 वरून 10000 पर्यंत करण्यात येणार आहे. व या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चासाठी 114 कोटी 45 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

जुने विद्युत ट्रान्सफर बदलण्यासाठी नवीन योजनेची घोषणा.

वैयक्तिक व सामायिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले विजेचे ट्रान्सफर बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला. या योजनेसाठी 1600 कोटी रुपये एवढ्या निधीच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 2023-24 या वर्षासाठी 200 कोटी, 2024-25 या वर्षासाठी 480 कोटी व 2025-26 या वर्षाकरिता देखील 480 कोटी रुपये निधी वितरित केला जाणार आहे. व या ट्रान्सफरच्या ऑइल बदली करण्यासाठी देखील 340 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

हे पण वाचा :- राज्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..!

हिरडा शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी अनुदान.

Cabinet Decision Maharashtra नैसर्गिक चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसान भरपाई करिता विशेष बाब म्हणून अनुदान वितरणासाठी राज्य सरकारने मदत करण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला‌. व यासाठी 15 कोटी 48 लाख रुपये एवढ्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे.

Leave a Comment