राहुल गांधींकडून शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा ; सरसकट कर्जमाफी, एम एस पी यांसारखे निर्णय घेणे शक्य -राहुल गांधी. Congress Manifesto 2024

WhatsApp Group Join Now

Congress Manifesto 2024.देशामध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी जाहीर केले की आमचे सरकार आले तर आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी आज पर्यंतचे सर्वात मोठे पाच निर्णय घेणार आहोत. त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व देशातील शेतकऱ्यांच्या मालाला एम एस पी लागू यांबरोबरच खत व बियाणासंबंधीतील देखील काही महत्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळेस केल्या तर मग त्या कोणत्या गोष्ट आहे सविस्तरपणे जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करणार.

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांमधील पहिली घोषणा अशी होती की मोदी सरकारला देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करता येते तर आम्ही आमचे INDIA गटबंधन चे सरकार आल्यानंतर देशातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करू. ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांना छोटीशी आर्थिक मदत होऊन त्यांचे जीवनमान करण्यात मोठा फायदा होईल.
हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर.

शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी एम एस पी लागू करू.

देशातील कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी  एम एस पी लागू करू. राहुल गांधी म्हणाले की मोदी सरकारचे म्हणणे आहे की कानूनी पद्धतीने एम एस पी लागू करणे शक्य नाही परंतु आमचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी एम एस पी नक्की लागू करू.

फसल बिमा योजनेत मोठी सुधारणा करणार.

देशामध्ये शेतकऱ्याच्या शेती पिकाला विम्याचे संरक्षण देण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू केली. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार फसल बिमा योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. या योजनेअंतर्गत केवळ विमा संरक्षण देणाऱ्या कंपन्यांनाच फायदा होतो. व या कंपन्याची आमच्याकडे लिस्ट असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.Congress Manifesto 2024.

शेती पिकांच्या निर्यात बंदी वरील कायद्यात दुरुस्ती करणार.

ज्यावेळेस देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य व पीक विक्रीस येथे त्याच वेळेस मोदी सरकार देशांतर्गत निर्यात बंदी लागू करते असा आरोप राहुल गांधी यांना केला. शेतमाल आयात निर्यात कायद्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतमाल आयात निर्यात कायद्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव देऊ.

शेतकऱ्यांसाठी जीएसटी लागू होणार नाही.

शेतकऱ्यांवर रासायनिक खते, औषधे व बी बियाणे यांच्यामार्फत विविध प्रकारे लागणाऱ्या जीएसटी टॅक्स वर निर्बंध घालू. व या जीएसटी कायद्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी केवळ एकदा टॅक्स देण्याचा प्रबंध करू व आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल की शेतकऱ्यांच्या शेतीमालावर व आवश्यकता गोष्टींवर जीएसटी टॅक्स लागू होता कामा नये.Congress Manifesto 2024.

Leave a Comment