बापरे..! कापसाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी नाराज, कापसाला मिळतो सध्या 8000 रुपये प्रतिक्विंटलच्या वर भाव. Cotton farmer maharashtra.

WhatsApp Group Join Now

Cotton farmer maharashtra. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे साठवणूक करून ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी विक्रीस काढला. कारण की कापसामध्ये होत असलेल्या पिसा व आल्यामुळे लहानांपासून ते थोरांपर्यंतच्या अंगावर खाज सुटली होती. त्यामुळे मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली परंतु आता कापूस थेट 8000 रुपये प्रति क्विंटल च्या वर विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

कापूस भाव वाढल्यामुळे शेतकरी नाराज.

यंदाचे वर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे कापसाला चांगला मिळेल अशी शेतकऱ्याची आशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत कापसाचा स्टॉक करून ठेवला होता. परंतु पैशाच्या अडचणीमुळे व कापसामुळे लोकांमध्ये होत असलेल्या रोगराईमुळे बहुतेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी कापूस विक्री केला. आता कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.Cotton farmer maharashtra.

या दरवाढीचा केवळ व्यापाऱ्यांना फायदा.

मागील महाशिवरात्रीपर्यंत देशामध्ये कापूस 7000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या खाली विक्री होत होता. त्यात अवकाळी मुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. परंतु आता कापसाला योग्य भाव मिळत असून शेतकऱ्याकडे कापूस शिल्लक नसल्यामुळे या दरवाढीचा केवळ व्यापाऱ्यांनाच फायदा होत आहे.

शेतकऱ्याचे यावर्षी डबल नुकसान.

यावर्षी कापूस हंगामाच्या सुरुवातीला पावसाने खंड दिल्यामुळे व त्यानंतर अतिवृष्टी अवकाळी व गारपिटमुळे कापूस या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले. त्यावर कापसाला लागणाऱ्या औषध आणि खताचा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यामानाने योग्य नफा राहत नाही. तर दुसरीकडे यावर्षी सरकारने कापसाला योग्य भाव न दिल्यामुळे शेतकऱ्याचे डबल नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीचे बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव.

राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल दिनांक 18 मार्च रोजी 3350 क्विंटल कापसाची आवड झाली तर कापसाला किमान 7500 रुपये तर कमाल 8350 रुपये आणि सर्वसाधारण 8370 रुपये भाव मिळाला. तर राज्यांमधील इतर बाजार समितीमध्ये कापसाला 7800 ते 8100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळत आहे.Cotton farmer maharashtra.
राज्यातील बाजार समिती मधील आजचे कापुस बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अकोट 673 7893 8172 8162
परशिवानी 729 7571 7981 8053
धानोरा 1282 7899 8123 8231
मानवत 1628 7671 7891 8142
सेलु 2711 7819 8311 8231
अकोला 542 7461 7819 8132

Leave a Comment