कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापूस भाव हंगामाच्या सर्वोच्च पातळीवर, पहा आजचा सर्वोच्च कापूस भाव. Cotton Market News Today.

WhatsApp Group Join Now

Cotton Market News Today. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, कापूस दरामध्ये दिवसेंदिवस सुधारणा पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 6700 ते 7300 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारा कापूस सध्या 8000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दराने विक्री होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कापसाचा स्टॉक संपत आल्यामुळे या दरवाढीचा राज्यातील सुरळीत शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे.

कापूस उत्पादकांसाठी खुशखबर.

राज्यातील कापूस उत्पादकांसाठी मोठी खुशखबर आहे कारण की काल परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डामध्ये मध्यम धाग्याच्या नंबर एक कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त भाव मिळत आहे. परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील पंधरा दिवसापासून कापूस दरात सतत सुधारणा होत आहे.
📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाचे शेतकऱ्यांसाठी 25 धडाकेबाज निर्णय, व निधी जाहीर.

बाजारात कापसाला सर्वोत्तम भाव.

Cotton Market News Today.गुरुवारी परभणी येथील बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल मध्यम धाग्याच्या सर्वोत्तम दर्जाच्या कापसाची आवक झाली होती. तर येथे या कापसाला किमान 7900 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 8000 रुपये आणि सर्वसाधारण 7940 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर त्याच वेळेस फरतड कापसाला 7300 ते 7900 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला.

राज्यातील बाजार समिती मधील कापूस दराची सद्यस्थिती.

राज्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 5000 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाचे आवक झाली तर या कापसाला किमान 7700 रुपये प्रतिक्विंटल तर कमाल 8080 रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण 8000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर या बाजार समितीमध्ये मागील 15 दिवसाच्या तुलनेमध्ये या आठवड्यात कापूस आवक वाढली होती. व दर गेल्या आठवड्यापासून आठ हजार रुपयापर्यंत स्थिर पाहायला मिळाले.

कसा राहील या महिन्यात कापुस बाजार.

राज्यातील बाजार समितीमध्ये सध्या कापसाला चांगला भाव मिळत असून यामागील प्रमुख कारण पाहायला गेले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कापसाला आणखीन देखील मागणी आहे. तर दुसरीकडे भारतीय आणि काही आंतरराष्ट्रीय उद्योगाकडून भारतीय कापसाला सर्वाधिक मागणी असल्यामुळे, भारतीय कापसाच्या खरेदीसाठी या उद्योगांमध्ये पकडा पकडा चालू आहे. यामुळेच हंगामाच्या शेवटी भारतीय कापूस 8000 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास विक्री होत आहे.Cotton Market News Today.

राज्यातील बाजार समितीमधील आजचे कापुस बाजार भाव.

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परशिवानी  634 6902 7341 7562
धानोरा  6292 7132 7314 7561
अकोला  971 7321 7531 7811
अकोट  631 7425 7632 7901
परभणी  328 7563 7891 7977
मानवत  1641 7891 7901 8182
धाराशिव  962 7891 7951 8121

Leave a Comment