Cotton Market Price Today कापूस दरातील तेजी कायम ; या बाजार समितीमध्ये कापसाला 9000 रुपयांपर्यंत ‌भाव, पहा आजचे बाजारभाव .

WhatsApp Group Join Now

Cotton Market Price Today देशातील कापूस बाजार मध्ये तेजीचे वातावरण आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या मार्च महिन्यामध्ये राज्यातील बाजार समितीमध्ये कापूस बाजार भाव 8000 रुपये प्रतिक्विंटल च्या वर विक्री होण्याची शक्यता बाजारातील तज्ञ लोकांनी व्यक्त केली आहे. याला मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खरोखरच भारतीय कापसाची मागणी शिगेला पोहोचली आहे. भारतीय कापसाच्या मागणीत 10 % वाढ झाली असून बाजार समिती कापसाला 8000 रुपये पर्यंत भाव मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची सद्यस्थिती.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारामध्ये कापसाचे प्रमुख खरीददार देश त्यामध्ये अमेरिका, चायना, बांगलादेश, भूतान व पाकिस्तान या देशाकडून भारतीय कापसाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे. व भारतीय कापूस वजनामध्ये जड तर धागा निर्मितीस अनुकूल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग भारतीय कापूस खरेदी करण्यास जोर देत आहेत.

देशांतर्गत कापूस बाजाराची सद्यस्थिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी वाढल्यामुळे व देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्यामुळे सध्या देशातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक घटली आहे. याचाच परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या दरात सुधारणा कायम आहे व दर टिकून आहेत.Cotton Market Price Today.

📢 हे पण वाचा :- वयोवृद्धांसाठी 4 मोठ्या योजना ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये पगार..!

आंतरराष्ट्रीय वायदे बाजाराची सद्यस्थिती.

आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात देखील कापसाचे भाव टिकून आहेत. ज्यात अमेरिकाच्या वायदे बाजारात वायदे दर 100 सेंट प्रतिपाउंडच्या आसपास आहेत. जो की भारतीय रुपयांमध्ये 18 हजार 300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विक्री होत आहे. तसेच आपल्या शेजारील चीनमध्ये देखील कापूस सध्या चांगलाच भाव खात आहे.

सध्याच्या कापूस दराला कशाचा आधार आहे.

Cotton Market Price Today आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीसाठी भारतीय कापसाला पसंती मिळत आहे. व देशातील काही शेतकऱ्यांनी कापसाचा उर्वरित स्टॉक मागे ठेवल्यामुळे बाजारात कापसाची आवक घटली आहे‌. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा कमी होत आहे आणि सरकीच्या भावामध्ये देखील कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.

.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! बोरवेलसाठी मिळणार ४०००० रुपयांपेक्षा जास्त अनुदान..!

कसे राहतील मार्च महिन्यामध्ये कापसाचे दर.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिकातील 75 टक्के कापूस विक्री झाला आहे व शेतकऱ्यांकडे केवळ 25 टक्के कापूस शिल्लक आहे. तसेच आपल्या देशात देखील 80 टक्के पर्यंत कापूस शेतकऱ्यांनी विक्री केला आहे. व भारतीय कापसाला चीन, बांगलादेश, व्हिएतनाम व मलेशिया या देशातुन मागणी वाढल्यामुळे देशात कापुस दर 8000 रुपयांपर्यंत टिकून राहतील.Cotton Market Price Today .

राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे कापुस बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परशिवानी  136 6984 7473 7654
अकोला  456 7123 7233 7533
अकोट  746 7333 7522 7755
मानवत  533 6899 7127 7344
कटोल 855 6964 7234 7344
अमरावती  533 7344 7644 7988
उमरेड  1232 7677 7899 8121

 

Leave a Comment