Cotton Market Rates Today. कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! राज्यात आज कापूस दरात विक्रमी वाढ, पहा आजचे कापूस दर.

WhatsApp Group Join Now

Cotton Market Rates Today.यावर्षीच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात असलेले कापूस तर मागील एका महिन्याच्या काळापासून थांबण्याचा विचार करत नाहीयेत. हंगामाच्या सुरुवातीला 6300 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कापूस सध्या 7700 ते 7900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार समिती विक्री होत आहे. व कापूस बाजाराची सद्यस्थिती पाहता या मार्च महिन्यात कापूस 8000 रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे विक्री होण्याचा अंदाज बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे.

कापूस दरात दोन दिवसांपासून सतत वाढ.

राज्यातील बाजार समितीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक 6900 ते 7100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाची विक्री होत होती. परंतु मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या दरात वाढ होत मागील आठ दिवसांपासून कापूस दरात सतत वाढ होत आहे. काल राज्यातील बाजारात कापसाला सर्वसाधारण 7900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

📢हे पण वाचा :- दुधाच्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव, तरच मिळेल अनुदान..!

सोयाबीनच्या दरात मात्र होईना वाढ.

राज्यातील बाजार समितीमध्ये कापूस, तुर, हरभरा व ज्वारी, गहू या पिकांना चांगला बाजार भाव मिळत असताना दुसरीकडे मात्र सोयाबीनचे भाव सुरुवातीपासूनच दबावत आहेत आणि आणखीन देखील सोयाबीनच्या भावात सुधारणा आढळून येत नाही. सध्या राज्यातील बाजारात सोयाबीनला सर्वसाधारण 4400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

लवकरच कापूस होणार 8000 रुपये क्विंटल.

Cotton Market Rates Today. राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात होत असलेली वाढ व आंतरराष्ट्रीय देशांकडून भारतीय कापसांची वाढत असलेली मागणी पाहता या मार्च महिन्याच्या शेवटी पर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये 8000 रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची विक्री होऊ शकते असा अंदाज आंतरराष्ट्रीय बाजारभाव तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.

📢हे पण वाचा :- खुशखबर..! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ व लाभ घेण्याचे आवाहन..!

कापूस भाव वाढण्यामागील कारणे.

राज्यातील शेतकऱ्यांकडे संपत आलेला कापसाचा स्टॉक व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कापसाचे वाढत असलेली मागणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योगांना पडत असलेला कापसाचा तुटवडा पाहता हंगामाच्या शेवटी देशात व प्रमुख्याने महाराष्ट्र राज्य मधील बाजार समिती कापसाचे भाव वाढले आहेत.Cotton Market Rates Today.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कापुस बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परभणी  263 6974 7291 7548
सेलु  744 7132 7342 7648
मानवत  643 7200 7400 7500
नांदेड  211 7463 7647 7953
अकोला  974 6973 7322 7543
परशिवनी  526 7182 7472 7655
धाराशिव  1966 7211 7533 7983
अकोट  532 7543 7853 8132

Leave a Comment