Cotton Market Todays Update शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बाजारात कापसाची मागणी वाढली, पहा आजचे कापुस बाजारभाव.

WhatsApp Group Join Now

Cotton Market Todays Update कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष कापूस खरेदीमध्ये कापसाचे भाव वाढले होते. शुक्रवारी व शनिवारी बाजारामध्ये 5 टक्क्यांनी वाढ होऊन कापूस भाव प्रति क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी वाढले. त्यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7800 ते 7900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर.

Cotton Market Todays Update राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे शेवटच्या टप्प्यातील कापूस शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला जास्त कापूस विक्री केल्यामुळे सद्यस्थितीला राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे आवक कमी होऊन कापूस दरामध्ये सुधारणा होत आहे. मार्च महिन्यामध्ये कापसाला चांगला भाव राहणार असून शेतकऱ्यांनी दोन किंवा तीन टप्प्यात कापूस विक्री केल्यास बाजारात कासाचा भावही टिकून राहील व शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल असे मत अभ्यासाकांनी व्यक्त केले.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मागेल त्याला व हवे तेवढे पीक कर्ज एका क्लिकवर मिळणार, किसान क्रेडिट कार्ड योजनेला सुरुवात..!

असे राहील कापूस बाजाराचे स्थिती.

गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाला चांगला उठाव होता. काही बाजार समितीमध्ये कापसाला 7700 ते 7900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आणि स्थानिक बाजारातील कापसाचे भाव कमी जास्त होत असली तरी, कापूस बाजार पडण्याची शक्यता नाही व कापसाला हे दर मार्च महिन्यामध्ये टिकून देखील राहू शकतात. Cotton Market Todays Update.

मार्च महिन्यातील कापूस विक्रीचे नियोजन.

मार्च महिन्यामध्ये कापूस बाजारात चढउतार राहण्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये कापूस विकायचा आहे त्यांनी 7900 ते 8100 प्रतिक्विंटल या दराने कापसाची विक्री करावी. कारण मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत कापूस पुन्हा एकदा आठ हजार रुपयांची पातळी बोलण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा..!

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची सद्यस्थिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय बाजार चांगल्या दराने खरेदी होत आहे. व याच कारणामुळे बांगलादेश, चीन व व्हीतनाम या देशांनी भारतीय कापसाची मागणी केली आहे व आंतरराष्ट्रीय उद्योगांना देखील सद्यस्थितीला भारतीय कापसाची गरज असल्यामुळे भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात चांगल्या दराने खरेदी केला जात आहे. याचाच परिणाम देशांतर्गत बाजारात व स्थानिक बाजारात पाहायला मिळत आहे.Cotton Market Todays Update.

राज्यातील बाजार समितीतील आजचे कापुस बाजार भाव. 

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
मानवत  654 6988 7239 7544
अकोट  633 7234 7644 7899
परशिवनी  822 7865 7973 8209
वडवणी  1426 7655 7899 7902
धारुर  654 7655 7766 7976
मानवत  326 6898 7344 7599
धाराशिव  644 7243 7455 7677

 

Leave a Comment