Crop insurance शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर ; मोबाईलद्वारे यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे.

WhatsApp Group Join Now

Crop insurance राज्यात 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या वितरणाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. आणि हा मंजूर निधी जिल्ह्यांमधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारकडे प्राप्त झालेल्या दाव्यानुसार या बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात येत आहे.

या जिल्ह्यांना नुकसान भरपाई चे वाटप.

गेल्या वर्षी राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई च्या पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये परभणी, हिंगोली व अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील रक्कम प्राप्त झाली आहे तसेच आता उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलं अनुदानाचे पैसे प्राप्त होत आहेत.

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार..!

संभाजीनगर जिल्ह्यासाठी पिक विमा जाहीर.

संभाजीनगर जिल्ह्यामधील 2023 मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 203 कोटी रुपयांचा निधी आज राज्य शासनाने जाहीर केला आहे आणि या मंजूर निधीचे वितरण वाढीव दरानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे.

निधी वितरणाचा तपशील.

नोव्हेंबर 2023 मध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण २ लाख ६४ हजार १९४ शेतकऱ्यांच्या १ लाख ४८ हजार ३६८.४८ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते आणि या नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने आता २०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर..!
पिक विमा मंजूर यादीत तुमचे नाव असे तपासा.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पिक विम्याच्या यादीमध्ये तुमच्या मोबाईलव्दारे नाव तपासता येते त्यासाठी सर्वप्रथम,

  • तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलमध्ये pmfby.gov.in असे सर्च करायचे आहे आणि व सरकारी वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे.
    त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटची होम स्क्रीन ओपन होणार आहे व या होम स्क्रीनवर तुम्हाला Beneficiary list हा पर्याय दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका आणि शेवटी तुमच्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
  • तसेच तुम्हाला ही यादी डाऊनलोड करायची असेल तर यात पेजवर तुम्हाला वरती डाऊनलोड करण्याचे ऑप्शन देखील देण्यात आले आहे.

Leave a Comment