खुशखबर..! दुष्काळ अनुदान 2023 चे पैसे आले ; फक्त हेच शेतकरी होणार अनुदानास पात्र. Dushkal Anudan 2023 Maharashtra

WhatsApp Group Join Now

Dushkal Anudan 2023 Maharashtra राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळासाठी नुकसान भरपाई अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाने राजकीय शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केला आहे व निधीचे विचार करण्यास परवानगी दिली आहे. अंतर्गत कोणत्या 15 जिल्ह्यातील कोणते 40 तालुके पात्र आहेत आणि या पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे हे अनुदान वितरित होईल याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखा जाणून घेऊया.

दुष्काळ अनुदान वितरणाचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वितरण करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

📢हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! चार वर्षे जुन्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे आले, बँकेचा मेसेज पहा..!

दुष्काळ अनुदानाचे पैसे आले.

Dushkal Anudan 2023 Maharashtra. राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे म्हणजेच दुष्काळामुळे राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामधील 22 लाख 34 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी दुष्काळ अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. हा निधी दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ वितरित करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत.

दुष्काळ अनुदानासाठी मंजूर निधी.

महसूल व वन विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वितरणास मंजुरी दिली व यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2443 कोटी 22 लाख 71 हजार रुपये इतका निधी वितरण करण्यास राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

📢हे पण वाचा :- राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर..! एप्रिल महिन्यामध्ये राशन दुकानात मिळणार मोफत या चार वस्तू..!

अनुदान वितरणाच्या पात्रता निकष व अटी.

महाराष्ट्र राज्य मध्ये ज्या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व राज्य शासनाने ज्या भागात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता, अशा भागातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या दुष्काळग्रस्त शेती पिकाची ई पीक पाहणी केली होती त्या ई पीक पाहणीच्या आधारावर हे मंजूर दुष्काळ अनुदान त्या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.Dushkal Anudan 2023 Maharashtra.

राज्यातील दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमधील अनुदानासाठी पात्र तालुके व मंजूर अनुदानाची रक्कम.
Dushkal Anudan 2023 Maharashtra.
Dushkal Anudan 2023 Maharashtra.

 

Leave a Comment