Dushkal Anudan 2023 अखेर दुष्काळ अनुदान जाहिर ; २ ऐवजी ३ हेक्टेरच्या मर्यादेत मिळणार अनुदानाची रककम.

WhatsApp Group Join Now

Dushkal Anudan 2023 राज्यात यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्याला पेरणी करण्यास विलंब झाला. खरीप हंगामाच्या शेवटी देखील 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. व आता या 40 तालुक्यामधील दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी आज एक शासन निर्णय निर्गमित करून निधी जाहीर केला आहे.

दुष्काळ निधी वितरणाचा शासन निर्णय.

Dushkal Anudan 2023 राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वितरण करण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे.

हे पण वाचा :- राज्य शासनाव्दारे कर्जमाफीची घोषणा ; या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्ज माफ,पहा कर्जमाफीची सविस्तर यादी..!

या निकषानुसार होणार दुष्काळ अनुदानाचे वितरण.

शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी पूर्वपरिस्थिती चक्रीवादळ व दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना पुढील हंगामात निधी उपयोगी पडावा याकरिता राज्य शासना मार्फत एका हंगामात एक वेळेस असे निविष्ठा अनुदान देण्यात येत असते. तसेच याबरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबींकरिता देखील राज्य शासनाकडून विहित दराने आर्थिक मदत देण्यात येते.Dushkal Anudan 2023.

2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदानाचे वितरण.

9 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती यांसारख्या नैसर्गिक यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानिकरीता 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाढीव दराने अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.

हे पण वाचा :- “पीएम सूर्यघर” योजनेअंतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार मोफत वीज ,आजच अर्ज करा..!

दुष्काळ अनुदानाच्या वितरणासाठी आज पर्यंतचा सर्वाधिक निधी मंजूर.

खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमधील 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विषयक निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता 2443 कोटी 22 लाख 71 हजार रुपये इतक्या निधीचे वितरण करण्यास राज्य शासनाचे मंजुरी देण्यात आली आहे.Dushkal Anudan 2023.

प्रति शेतकरी किती अनुदान मिळणार.

खरीप हंगाम 2023 मध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाढीव दराने या दुष्काळ अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

Leave a Comment