Farmer foreign tour :- शेतकऱ्यांसाठी मोफत परदेश दौरा ; जाण्यासाठी लगेच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now

Farmer foreign tour :- प्रत्येक व्यक्तीला विदेशातील संस्कृतीचे तसेच तेथील शहरांचे आणि इतर देखील भरपूर साऱ्या गोष्टींचे कुतूहल असते व प्रत्येक व्यक्तीची परदेशामध्ये जाण्याची देखील इच्छा असते परंतु परदेशामध्ये जाण्यास येणारा खर्च यामुळे सामान्य माणूस या गोष्टीस टाळाटाळ करत असतो परंतु आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे परदेश दौरा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे आणि त्यासाठी अर्ज देखील करण्यास सुरुवात झाली आहे.

सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी मोफत परदेश दौरा :-

आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमध्ये होत असलेले बदल तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून कशाप्रकारे शेती करता येते याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तब्बल चार वर्षानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी परदेशाचा अभ्यास दौरा जाहीर केला आहे. Farmer foreign tour

राज्य शासनाच्या कृषी विभागाने 15 जानेवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कृषी कार्यालयांना पत्र पाठवून राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांना पाच फेब्रुवारी पर्यंत परदेश अभ्यास दौऱ्याला जाण्यासाठीच्या अर्जाचे प्रस्ताव राज्य कृषी विभागाकडे पाठवण्यास सांगितले गेले होते. आणि या विशेष परदेश दौऱ्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये दहा कोटी रुपयांची पुरवणी मागणी देखील सादर करण्यामध्ये आली होती.

हे ही वाचा :-  राज्यातील या महिलांना होणार मोफत नऊवारी साडीचे वाटप.
फक्त याच  शेतकऱ्यांची दौऱ्यासाठी निवड :-
  • परदेश दौऱ्याला जाण्यास अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे जमीन असावी व त्यांच्याकडे सातबारा व आठ अ चा उतारा असावा,
  • शेतकऱ्यांकडे वैद्य पासपोर्ट आणि ओळखपत्र असायला हवे,
  • इच्छुक शेतकरी शेती शिवाय इतर कोणत्याही शासकीय किंवा निम्न शासकीय सेवेमध्ये नसावा,
  • इच्छुक शेतकऱ्यांचे वय किमान 25 ते 60 या दरम्यान असायला हवे,
  • शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने कोणताच प्रदेश दौरा केलेला नसावा
  • आणि इच्छुक शेतकऱ्यांकडे परदेश दौऱ्याला जाण्यास पात्र असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असायला हवे.
या देशांमध्ये होणार अभ्यास दौरा :-

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी काही देशांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जर्मनी, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्पेन, चिल्ली, स्विझर्लंड, ब्राझील, ऑस्ट्रिया, पेरू, न्युझीलँड, थायलंड, व्हिएतनाम व मलेशिया या काही देशांची राज्य शासनाच्या कृषी विभागाने निवड केली आहे. Farmer foreign tour

हे ही वाचा :- पि एम किसान व नमो शेतकरी योजनांचे हाप्ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार.
परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्याला एवढा खर्च येणार :

2021 या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना इस्त्राईल चा प्रदेश दौरा केला होता त्यावेळेस प्रति शेतकरी दौऱ्यासाठीच्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती इच्छुक शेतकऱ्यांना देण्यात येत होती.

त्यावेळेसच्या परदेश दौऱ्यासाठी प्रति लाभार्थी खर्च एक लाख एकवीस हजार रुपये एवढा निश्चित करण्यात आला होता व आता दौऱ्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांला ५०% रक्कम भरावी लागणार आहे. Farmer foreign tour

व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त करण्यासाठी दौऱ्या अंतर्गतच्या विमान तिकिटांची प्रत, व इतर खर्चाची बिले सरकारकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

Leave a Comment