Farmer relief fund :- या जिल्ह्यांना 2023 च्या नुकसान भरपाई चे वितरण चालू ; पहा सविस्तार यादी .

WhatsApp Group Join Now

Farmer relief fund :- मागील काही महिन्यांपासून राज्य शासनाने राज्यांमधील ज्या जिल्ह्यांना 2023 च्या नुकसान भरपाई चे वितरण झाले नाही त्यांना त्याचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या दाव्यानुसार हा निधी दोन ते तीन जिल्ह्यांना एक सोबत वितरित करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांना या नुकसान भरपाई चे वाटप केले होते आणि आता पुन्हा एकदा तीन ते चार जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईच्या निधीला एक शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिली आहे आणि याचे वितरण देखील अवघ्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे.

नुकसान भरपाई वितरणासाठी शासन निर्णय जाहीर :-

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या मानसूनोत्तर अवकाळी पावसामुळे हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत ४ लाख ८९ हजार ४१२ शेतकऱ्यांच्या २ लाख १८ हजार २१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ते ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. आणि यासाठी सरकारकडे निधी मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता ज्याला आज एक शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिली आहे. Farmer relief fund.

हे पण वाचा :- पेट्रोल-डिझेल होणार तब्बल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त ; पहा मार्च महिन्याचे दर..!

या जिल्ह्याला सर्वाधिक नीती मंजूर :-

या शासन निर्णयानुसार या दोन्ही बाधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २९८ कोटी ६७ लाख २४ हजार रुपये एवढ्या निधीच्या वितरणाला मान्यता दिली आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी १३० कोटी ८० लाख ५९ हजार व हिंगोली जिल्ह्यासाठी १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये एवढ्या निधी वितरणास महसूल व वन विभागाने शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे.

परभणी जिल्ह्यासाठी  १३० कोटीरुपयांची तरतूद :-

नोव्हेंबर महिन्यामध्ये अचानक झालेल्या मानसूनोत्तर अवकाळी पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ५८० गावांमधील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या बागायती, जिरायती आणि फळ पिकांचे मिळून एकूण ९५ हजार ५३ हेक्टर वरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले होते. Farmer relief fund.

वाढीव दराणानुसार मदत मिळणार :-

जिरायती क्षेत्रातील नुकसान भरपाईसाठी वाढीव दराने ९४ हजार ३३८.४४ हेक्टर मधील पीक नुकसानीबद्दल १२८ कोटी ३० लाख २ हजार ७८४ रुपये, बागायती क्षेत्रासाठी ७६ हेक्टर मधील पीक नुकसानीबद्दल २० लाख ७६ हजार ३०० रुपये तर, ६३८ हेक्टर मधील बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २ कोटी २९ लाख ७९ हजार ८८० रुपये असे एकूण १३० कोटी ८० लाख ५९ हजार रुपयाच्या नीधी वितरणास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज ; या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता..!

हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधीची तरतूद  :-

तसेच हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४८७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार हेक्टर वरील शेती पिकांचे नोव्हेंबर महिन्यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.१ लाख २१ हजार ७१४ हेक्टर वरील जिरायती पिकांचा तर १६२ हेक्टर वरील बहुवार्षिक पिकांचा समावेश होतो. Farmer relief fund.

आणि या जिल्ह्यातील जिरायती पिकांच्या नुकसानी बद्दल वाढीव दराने १६५ कोटी ५४ लाख ५१ हजार ८४० रुपये तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाई साठी ५८ लाख ३२ हजार रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश :-

या दोन्ही जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावा तसेच बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी हा निधी होल्ड करू नये अशा जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना सूचना निर्गमित करण्याचे आदेश महसूल व वन विभागामार्फत या शासन निर्णय मध्ये देण्यात आले आहेत. Farmer relief fund

 

 

Leave a Comment