Farmer Scheme Maharashtra शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट.

WhatsApp Group Join Now

Farmer Scheme Maharashtra राज्यातील नागरिकांना 85 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी, रसवंती, शेळीगट व शेतीला तार कुंपण दिले जात आहे. तर मग राज्य शासनाने या लाभांचा फायदा घेण्यासाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे, आणि या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी पात्र असतील व योजनेअंतर्गच्या अनुदानाचे वितरण कशाप्रकारे केले जाईल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

राज्यातील नागरिकांसाठी नवीन योजनेची घोषणा.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या न्यूक्लिअर बजेट अंतर्गत अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. याच विभागाअंतर्गत अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना रसवंती, पिठाची गिरणी, तारेचे कुंपण आणि शेळी गटाचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.Farmer Scheme Maharashtra.

हे पण वाचा :- या कारणांमुळे तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळाले नाही ; फक्त एक काम करा व मिळवा 6000 रुपये..!

या नवीन योजनेची संपूर्ण रुपरेखा.

Farmer Scheme Maharashtra 2013-14 च्या आधी किराणा दुकानदारांना रसवंती व पिठाची गिरणी वितरण करण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जात होता परंतु सध्या ती योजना कार्यरत नाही. व सध्याच्या या योजनेअंतर्गत वरील चारही लाभांसाठी 5000 रुपयांच्या मर्यादेमध्ये 85 टक्के अनुदान वितरित केले जाते. गरजेनुसार यादेखील योजनेमध्ये थोडेफार बदल केले जातात.

फक्त याच जिल्ह्यांसाठी राबवली जाती योजना.

राज्यातील स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनामार्फत ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर व जालना या चार जिल्ह्यातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या न्यूक्लिअर बजेट विभागाअंतर्गत या योजना राबवल्या जातात.

हे पण वाचा :- अखेर कापसाचे भाव वाढले ; या बाजार समितीमध्ये आज कापसाचे भाव 1200 रुपयांनी वाढले..!

योजनेसाठीच्या पात्रता आणि अटी.

राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री-पुरुषांना या योजनेअंतर्गत लाभ वितरित करण्यात येतो. यासाठी संबंधित लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा स्थानिक नागरिक असायला हवा व त्याचे वय 18 ते 60 या वयोगटातील असायला हवे. संबंधित लाभार्थ्याकडे सर्व अधिकृत अशी कागदपत्रे देखील असायला हवी.Farmer Scheme Maharashtra.

योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प न्यूक्लिअर बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी विविध कागदपत्रे लागतात. तार कंपनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा, 8/अ तर पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विज बिल व इतर योजनांसाठी रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, कोणतेही ओळखपत्र, एक पासपोर्ट साईज फोटो व उत्पन्नाचा दाखला असी कागदपत्रे लागतात. हे सर्व कागदपत्र असेल तुम्ही राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प न्यूक्लिअर बजेट या विभागाकडे 29 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज दाखल करू शकता.

Leave a Comment