FARMERS SCHEME फेब्रुवारी महिन्यामध्ये या आणखीण तीन योजनांचे १५ ते २० हजार रुपये जमा होणार.

WhatsApp Group Join Now

FARMERS SCHEME शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, आणि ती खुशखबर म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या महिन्यामध्ये राज्य शासनाच्या या तीन योजनांचे पैसे सरसकटरीत्या जमा करण्यात येणार आहेत. ज्याकी या तीन योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 25 ते 30 हजार रुपयांची आर्थिक मदत प्राप्त होणार आहे. तर मग त्या कोणत्या तीन योजना आहेत त्यांचे पैसे या महिन्यात तुम्हाला मिळतील चला तर मग सविस्तररित्या आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

या योजनेचे फेब्रुवारी महिन्यात पैसे जमा होणार.

तर मग शेतकरी मित्रांनो या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणारी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हाप्त्याचे पैसे याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 11 वाजून 30 मिनिटाला महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर देखील देण्यात आली आहे. यवतमाळ येथे नरेंद्र मोदी यांची एक विशेष सभा आहे आणि या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह काही मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.FARMERS SCHEME.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

या देखील योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्यात जमा होणार.

तसेच यानंतरची दुसरी योजना ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहेत ती योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना.

FARMERS SCHEME प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2020 22 मध्ये अतिवृष्टी चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे, पाळीव प्राण्याचे तसेच घरगुती मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरण करण्यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने एक शासन निर्णय निर्गमित करून एकूण 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे.

फ़क्त याच बधितासाठी मदत जाहिर.

तसेच संबंधित मंजुर निधी हा अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवेळी अधिकाऱ्याकडून संबंधित नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाकडे मदतीचे प्रस्ताव दाखल केले होते अशा लाभार्थ्यांना या निधीचे बँक खात्यामध्ये सरसकट वितरण करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- 2020-22 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतिपिके व मालमत्तांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे आले..!

या योजनेच्या आनुदानाची प्रतीक्षा संपली.

तसेच यानंतरची तीसरी व शेतकऱ्यांना सर्वात जास्त आतुरता असलेली योजना ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहेत ती योजना म्हणजे राज्यशासनाची नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना. 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील दुसरा हप्ता देखील याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने एकुण 1972 कोटी रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे.FARMERS SCHEME.

या दिवसी जमा होणार हफ्त्यांचे पैसे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्या प्रमाणे यापुढे पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हाप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हाप्त्याचे देखील वितरण केले जाईल.त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येणाऱ्या पी एम किसानच्या 16 व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हाप्त्याचे देखील वितरण केले जाऊ शकते.

 

Leave a Comment