First AC bus station विमानतळाच्या सुविधा असलेले राज्यातील पहिले आधुनिक बस स्थानक.

WhatsApp Group Join Now

First AC bus station महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये नाशिक येथे काही मोठ्या विकास कामाचे उद्घाटन केले होते. यामध्ये मेळा येथील बसस्थानकाचा देखील समावेश होता. हे बस स्थानक आता तयार झाली असून यामध्ये विमानतळा सारख्या आधुनिक सुविधा देण्यात आले आहेत.

विमानतळाच्या सुविधा असलेले बस स्थानक.

नाशिक शहरी देशाच्या धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर आहे. या शहरात कुंभमेळाव्यासारखा सर्वात मोठा मेळावा पार पडतो आणि याच्याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये वाहतुकीच्या आणि विकासाच्या सुविधा पुरवण्याकरिता नाशिक शहरात विशेष कामे करण्यात येत आहे.

हे पण वाचा :- शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी..!
नाशिकमध्ये मोठी विकास कामे .

नाशिक मध्ये हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर, श्रीगंगा गोदावरी मंदिर, श्रीकाळाराम मंदिर, सीतागुंफा, श्रीकपालेश्वर मंदिर, सुंदर नारायण मंदिर, श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर व श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर असल्यामुळे येथे भाविकांची आणि पर्यटकांची हमखास वरदळ असते.

राज्यातील पाहिले AC बस स्थानक.

नाशिक मधील मेळा बस स्थानक हे राज्यातील पहिले वातानुकूलित बस स्थानक असणार आहे त्यामध्ये एकूण 20 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून यांपैकी चार प्लॅटफॉर्म हे एसी प्लॅटफॉर्म आहेत ज्या अंतर्गत प्रवाशांना एसी मध्ये बसून बसची प्रतीक्षा करता येईल. आणि आपण स्थानकाचे उद्घाटन 10 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- सोन्याचे भाव घसरले ; सोने खरेदी करण्याची संधी चुकू नका..!
मेळा बस स्थानकाचे वैशिष्ट्ये.

मेळा बस स्थानकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे बस स्थानक 55 हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधले गेले असून, या बस स्थानकातून दररोज 1500 पेक्षा जास्त बसेस ये-जा करणार आहेत.

तसेच या बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी लागणाऱ्या प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामध्ये प्रवाशांसाठी स्वच्छ आणि सुंदर उपहारगृहाचा समावेश होतो.

विशेष म्हणजे या बस स्थानकामध्ये पोलीस चौकी प्रवाशांसाठी विश्रामगृह आणि प्रतीक्षा ग्रह व अतिथी ग्रह असणार आहे.

या बसस्थानकामध्ये पुरुष चालक वाहक यांच्यासाठी वेगळे व महिला चालक वाहक यांच्यासाठी वेगळे विश्रामगृह असणार आहे.

तसेच बसस्थानकातील अधिकाऱ्यांसाठी देखील वेगवेगळे विश्रामगृह तयार करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या बस स्थानकात प्रवाशांसाठी RO च्या शुद्ध पाण्याचा प्रबंध करण्यात आला आहे.

तसेच प्रवाशांमधील नवजात मातांसाठी येथे स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे.

बस स्थानकात उत्तम प्रकारच्या वॉशरूम असून दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र वॉशरूमची सुविधा देण्यात आली आहे.

या प्रशस्त बसस्थानकाच्या अंतर्गत स्वतंत्र वाहन पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment