free flour mill yojana महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ; अर्ज करण्यास सुरुवात.

WhatsApp Group Join Now

free flour mill yojana राज्यातील ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना महिला व बालकल्याण विकास विभागा अंतर्गत पिठाची गिरणी पापड मशीन तसेच तुरडाळ मशीन शिलाई मशीन आणि पिको फॉल मशीन यांचे वाटप करण्यात येत आहे. तर मग यासाठी अर्ज करण्याची शेवट तारीख काय आहे अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्रे लागतील आणि योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात सविस्तर येत्या जाणून घेऊया.

काय आहे ही योजना ?

राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि आपल्या घराचा घर खर्च भागवण्यासाठी घरगुती आणि छोटे व्यवसाय सुरू करण्यास राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. आणि यासाठी राज्य शासनांतर्गत महिला व मुलींसाठी भरपूर साऱ्या योजना राबवण्यात येत आहेत आणि त्यांपैकीच एक असणारी ही योजना आहे. free flour mill yojana.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

या महिलांना मिळणार योजनेचा लाभ.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी साहित्य वाटप केले जाते. व या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला हे महाराष्ट्र राज्याची स्थाई नागरिक असायला हवी. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांच्या आत असायला हवे. महिलेकडे आधार कार्ड बँक पासबुक आणि इतर अधिकृत कागदपत्रे असायला हवीत.free flour mill yojana.

योजनेचा लाभ घेण्यास या महिला पात्र.

संबंधित योजनेचा लाभ ग्रामीण भागातील 16 ते 60 वयोगटातील स्त्रिया व महिलांना मिळेल. संबंधित महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. संबंधित महिला कोणत्या शासकीय किंवा निम्न शासकीय सेवेत कार्यरत नसावे. इच्छुक महिलेने याआधी शासकीय अनुदानावर या वस्तूंची खरेदी केलेली नसावी, असे जाणून आल्यास संबंधित महिलेला योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येईल.free flour mill yojana.

तसेच योजनेस इच्छुक महिलेने याआधी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत मागील तीन वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
तसेच वरील सर्व अटींची पूर्तता करूनच महिलेने अर्ज सादर करावा.
सदर योजनेतील लाभार्थी व्यक्तीची निवड प्रक्रिया समाज कल्याण विभागाअंतर्गत च्या निवड समितीकडे असणार आहे.

हे पण वाचा :- राज्यातील कामगारांना कामगार पेटी व गृह उपयोगी वस्तूंचे वाटप ..!

योजनेसाठी अर्ज कोठे करावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेला जिल्हास्तरावरील जिल्हा परिषद कार्यालयांकडे किंवा तालुकास्तरावरील पंचायत समिती कार्यालय येथील महिला व बालकल्याण विभाग येथे भेट द्यायची आहे.free flour mill yojana
त्यानंतर तेथील संबंधित अधिकारी तुम्हाला योजनेबद्दल ची सविस्तर माहिती देतील.
व त्यांच्याकडून पिठाची गिरणी या योजनेसाठी चा अर्ज घ्यायचा आहे व तो सविस्तर भरून संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, विज बिल प्रत, एक पासपोर्ट साईज फोटो अशा प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. व या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स परत तुम्हाला संबंधित अर्ज सोबत जोडून द्यायची आहे.

Leave a Comment