Free higher education for girls मुलींचे उच्च शिक्षण झाले मोफत ; सरकार भरणार १०० टक्के फीस.

WhatsApp Group Join Now

Free higher education for girls राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व कुटुंबातील विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकार घेणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान यांबरोबरच अभियांत्रिकी, डिप्लोमा व फार्मसी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा १०० टक्के खर्च राज्य सरकार भरणार आहे.

काय आहे ही योजना.

राज्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना व्यावसायिक शिक्षण व उच्च शिक्षण घेता यावे याकरिता राज्य शासनामार्फत त्यांची शालेय फी भरण्यात येणार आहे. योजना 2024-25 या शैक्षणिक वर्षा करिता राबविण्यात येत आहे. लवकरच या योजने संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभागातील प्रशस्त अधिकारी यांनी दिली आहे.Free higher education for girls.

हे पण वाचा :- अखेर नमो शेतकरी सन्माननिधि योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहिर ..!
या अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळणार मोफत.

Free higher education for girls सर्व प्रकारच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील शिक्षणासाठी तसेच महाविद्यालयीन व खाजगी महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठांमध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार भरणार आहे.

योजनेमुळे हा फायदा होणार.
  1. राज्यामध्ये महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये होणारी घट यामुळे कमी होणार आहे.
  2. विद्यार्थीना तांत्रिक वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेणे यामुळे सोयीस्कर आणि सोपे होईल.
  3. दरवर्षी राज्यात शिक्षणाच्या ओजामुळे आणि वाढत्या शिक्षणाच्या खर्चामुळे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या आत्महत्या करण्याच्या घटना समोर येत असतात या योजनेमुळे त्यांना देखील आळा बसेल.
हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला मोफत मिळणार वीज ; सोलर पॅनलसाठी आजच अर्ज करा..!
कशी आहे योजनेची सद्यस्थिती.

सध्या योजनेअंतर्गत खाजगी संस्थांमध्ये किंवा सरकारी विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार घेत आहे व ओबीसी एबीएस व ईडब्ल्यएस प्रवर्गातील आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा 50 टक्के खर्च राज्य सरकार भरती यांच्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट कायम आहे.Free higher education for girls.

योजनेच्या अनुदानाचा लाभ कसा मिळेल.

कोणत्याही उच्च महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
हे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक फि अंतर्गत शंभर टक्के फिचा परतावा मिळणार आहे.

Leave a Comment