राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत मिळणार सायकल व लॅपटॉप ; आजच अर्ज करा. Free Laptop Yojana 2024.

WhatsApp Group Join Now

Free Laptop Yojana 2024.राज्यातील महिलांसाठी, मुलींसाठी, वयोवृद्धांसाठी, शेतकऱ्यांसाठी व आता राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी देखील एका योजनेअंतर्गत मोफत सायकल व लॅपटॉप देण्याचे ठरवले आहे. यासाठी गरजवंत विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून सायकल आणि लॅपटॉप चा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ.

Free Laptop Yojana 2024.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने 2023-24 या वर्षाकरिता राज्यातील ग्रामीण भागातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सेस योजना राबविल्या आहेत.व याच योजनेअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी या वस्तूंचे वितरण केले.

📢 हे पण वाचा :- मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात वाढ ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-अजित पवार..!

संबंधित योजनेचे उद्दिष्टे.

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे व त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करणे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांना व विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो.Free Laptop Yojana 2024.

लॅपटॉपसाठी किती अनुदानाची तरतूद.

राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या लॅपटॉप साठी राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत 100 टक्के अनुदान केले जाते. म्हणजे तुम्हाला लॅपटॉप खरेदीसाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. संबंधित लाभार्थ्याला त्याच्या अधिकृत कागदपत्रासोबत फक्त योजनेसाठी अर्ज सादर करायचा आहे व योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

📢 हे पण वाचा :- राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा..!

सायकलसाठी किती अनुदानाची तरतूद.

शाळांपासून विद्यार्थ्यांचे घर लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागते. व याच कारणास्तव राज्य सरकारने अशा लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर म्हणजे मोफत पद्धतीने सायकलचे वाटप केले जात आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे यासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत उपचारासाठी देखील अर्थसहाय्य.

दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय्य पुरवण्याकरिता समाज कल्याण विभागामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. व त्यानुसार ईश्वर चिट्ठी द्वारे अर्जांची निवड करण्यात आली असून, अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या उपचारासाठी देखील राज्य शासनाकडून अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे.Free Laptop Yojana 2024.

Leave a Comment