महिलांसाठी आनंदाची बातमी..! महिलांना शिलाई व पिको फॉल मशीनसाठी 100% अनुदान. Free Silai Machine Yojana

WhatsApp Group Join Now

Free Silai Machine Yojana महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी व महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व योजना अंतर्गत भरघोस अनुदानाचे वितरण केले जाते. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन साठी अनुदान, महिलांना शिलाई मशीन, पिको फॉल मशीन साठी अनुदान व घरगुती पिठाची गिरणी, डाळ प्रक्रिया मशिन यांसारख्या घरगुती उद्योग उभारणीसाठी देखील अनुदान दिले जाते.

महिलांना शिलाई मशीनसाठी 100% अनुदान.

राज्यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना उद्योग धंदे करण्यास प्रवर्त करण्यासाठी व त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारने महिलांना शिलाई मशीन व पिको फॉल मशीन साठी 100% अनुदान जाहीर केले आहे. म्हणजे महिलांना या दोन्ही मशीन अगदी मोफत स्वरूपात वितरित केल्या जाणार आहेत. Free Silai Machine Yojana.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई झाली मंजूर..!

यादेखील योजनांचा यामध्ये समावेश.

Free Silai Machine Yojana समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 90% अनुदानावर तुषार सिंचन व ठिबक सिंचन दिले जाते. तर राज्यातील आदिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व नागरिकांसाठी किराणा दुकान व हॉटेल साठी 85% अनुदान दिले जाते. तसेच विशेषतः महिलांसाठी झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन यांचा योजनेअंतर्गत समावेश आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी आवश्यक कागदांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये शुभेच्छुक लाभार्थ्याकडे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो व संबंधित उद्योगासाठी ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. Free Silai Machine Yojana.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! दुबईत 14 हजार तर बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यात होणार..!

योजनेसाठी अर्ज कुठे सादर करायचा.

योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या वरील सर्व कागदपत्रांसहित संबंधित योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जिल्हास्तरावरील समाज कल्याण विभागाअंतर्गच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेसाठीचा अर्ज भरून संबंधित कार्यालय मध्ये सादर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला योजनेअंतर्गत च्या अनुदानाचा व योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Comment