शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठ्यासाठी आता शंभर टक्के अनुदान आजच करा अर्ज.Gai Gotha Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Gai Gotha Yojana 2024 राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा उभारण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अनेक शेतीशी निगडित असलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान स्वरूपात सबसिडी दिली जाते.

अशीच एक योजना ज्या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर गाय गोठ्याचे वितरण केले अशीच एक योजना ज्या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर गाय गोठ्याचे वितरण केले जात आहे. तर मग काय आहे ते योजना व योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र असतील व त्यांना अनुदानाचे वितरण कसे होईल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे गाय गोठा अनुदान योजना.

Gai Gotha Yojana 2024. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त जोडधंदा करण्यासाठी म्हणजे गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे पालन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा यांसाठी राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते. व याच पाळीव प्राण्याच्या गोठ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर जास्तीत जास्त 70 हजार रुपयांपर्यंतची अनुदानित रक्कम देण्यात येते.

📢 हे पण वाचा :- महिलांसाठी आनंदाची बातमी..! महिलांना शिलाई व पिको फॉल मशीनसाठी 100% अनुदान..!

गाय गोठा व्यतिरिक्त यादेखील योजनांचा घ्या फायदा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना 100% अनुदानावर राबवल्या जातात यामध्ये शेळीपालन शेड, कुकुट पालन शेड, रेशीम उद्योग, फळबाग लागवड, गाय म्हशींचा गोठा, विहिरीचे पुनर्भरण व शेत बांध-बंधिस्ती अशा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

योजनेचा लाभ कसा मिळेल.

सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी वीस ते पंचवीस फळझाडे लावून त्यांचें तीन वर्ष संगोपन केलेले असावे किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतचे कामगार या योजनेसाठी पात्र असतील. अशा कामगारांना ग्रामपंचायत मार्फत योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत च्या कामगार सेवकाकडे जमा करून योजनेसाठी अर्ज करायचा आहे.Gai Gotha Yojana 2024.

📢 हे पण वाचा :- निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा ; अखेर आज शासन निर्णय आला..!

योजनेच्या अनुदान वितरणाची पद्धत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के अनुदानावर म्हणजे जास्तीत जास्त सत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. लाभार्थ्याने संबंधित योजनेचा लाभ घेतल्यानंतर ग्रामपंचायतच्या सहमतीने लाभार्थ्याच्या बँक मध्ये अनुदानाची रक्कम वितरित केली जाते.Gai Gotha Yojana 2024.

Leave a Comment