खुशखबर..! आता घरेलु कामगारांना सुद्धा मिळणार भांडी संच व 5000 रुपये अनुदान. Gharelu kamgar yojana 2024.

WhatsApp Group Join Now

Gharelu kamgar yojana 2024 राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून संसार उपयोगी भांडी संच व बांधकामासाठी उपयोगी सर्व साहित्यांची पेटी दिली जात आहे. व आता याच योजनेबरोबर राज्यातील घरेलू कामगारांसाठी देखील संसार उपयोगी भांडी संच व 5 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे याबद्दलचा शासन निर्णय देखील राज्य शासनाने वितरित केला आहे. तर मग या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कोणते लाभार्थी पात्र असतील याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

योजनेच्या शासन निर्णयाची माहिती.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकर्म विभागाने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात सन 2023 24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे जीवित व नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! ज्येष्ठांना मिळणार 3000 महिना पगार , 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत..!

घरेलू कामगार संचामध्ये कोणत्या वस्तू मिळतात.

अ.क्र. वस्तु  संख्या 
वाट्या ४ नग
ताट ४ नग
ग्लास २ नग
पातेले २ नग
चमचा २ नग
जग १ नग
मसाला डब्बा १ नग
डब्बा झाकणासह १४  इंची १ नग
डब्बा झाकणासह १६ इंची १ नग
१० डब्बा झाकणासह १८  इंची १ नग
`११ परात १ नग
१२ प्रेशर कुकर १ नग
१३ कढाई १ नग
१४ स्टीलची टाकी १ नग

घरेलु कामगार मंडळा अंतर्गतच्या इतर योजना.

Gharelu kamgar yojana 2024. महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांची घरेलू कामगार मंडळाअंतर्गत नोंदणी करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. सद्यस्थितीला या मंडळ अंतर्गत अंत्यविधी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसदारास कामगाराच्या अंत्यविधीसाठी 2000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना मिळणार 5000 रुपये अनुदान.

महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार मंडळा अंतर्गत नोंदणीकृत महिला कामगाराच्या बाळांतपणासाठी 5000 रुपये अनुदान देण्यात येते. तसेच प्रसूती लाभ महिला कामगाराला दोन अपत्यापर्यंत 5000 रुपये अनुदान असे 10 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येतेपर्यंत अनुदान देण्यात येते.Gharelu kamgar yojana 2024.

📢 हे पण वाचा :- दुधाच्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव, तरच मिळेल अनुदान..!

योजनेअंतर्गत नोंदणी व आवश्यक कागदपत्रे.

या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी घरेलू कामगाराकडे रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक पासबुक व तीन पासपोर्ट साईज फोटो. या सर्व कागदपत्रांसोबत तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या https://mahabocw.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.Gharelu kamgar yojana 2024.

Leave a Comment