आता प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; राज्यात हजारो घरकुलांना मंजुरी व निधीमध्ये वाढ. Gharkul Yojana Maharashtra.

WhatsApp Group Join Now

Gharkul Yojana Maharashtra. देशामध्ये प्रत्येक गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे व पक्के घर मिळण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र विविध योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत देशातील कानाकोपऱ्यातील आणि खेड्यापाड्यातील प्रत्येक गोरगरिबाला पक्के घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. व आता घरकुल योजनेतील नवीन बदलानुसार केंद्र सरकारने घरकुलाच्या निधीमध्ये वाढ देखील करण्याचा निर्णय घेतला आहे.

या जिल्ह्यासाठी दोन महिन्यात हजारो नवीन घरकुल.

राज्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यासाठी मागील गत दोन महिन्यांमध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत 16041, रमाई आवास योजनेअंतर्गत 2837 व शबरी आवास योजनेअंतर्गत 273 अशी एकूण मागील दोन महिन्यांमध्ये 19 हजार 151 घरकुले बीड जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहेत.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! फळबाग लागवडीसाठी आणखीन 50 कोटी तर सर्वसामान्य प्रवर्गासाठी 20 कोटी मंजूर.!

संभाजीनगर जिल्हा घरकुलामध्ये नंबर एक वर.

Gharkul Yojana Maharashtra. मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोदी आवास योजना अंतर्गत 5 हजार 460 घरकुले तर रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत 6 हजार 209 व शबरी घरकुल आवास योजनेअंतर्गत 1 हजार 158 अशी एकूण 12 हजार 827 घरकुले मागील दोन महिन्यांमध्ये केवळ एका जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली आहे.

तिन्ही योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत.

मोदी आवास योजनेसाठी लाभार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असावा, लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाचे हक्काचे पक्के घर नसावे, लाभार्थ्याचे वार्षिक कुटुंब 1.20 लाख रुपयाच्या आत असावे व लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.

रमाई घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असावे, लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाच्या हक्काचे पक्के घर नसावे व लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.

शबरी घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे, लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याच घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा व लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाच्या मालकीचे हक्काचे पक्के घर नसावे.Gharkul Yojana Maharashtra.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! रेशीमला मिळत आहे ५३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व तुती लागवडीसाठी अनुदान..!

योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा कराल.

मोदी आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना व शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही ग्रामसभेत झाल्यानंतर पंचायत समिती मार्फत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो व व शबरी घरकुल आवास योजनेसाठीचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे सादर करावा.

Leave a Comment