GHARKUL YOJANA प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या.

WhatsApp Group Join Now

GHARKUL YOJANA पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला घर देणार या घोषणेप्रमाणे संपूर्ण देशभर गोरगरिबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधून दिली जात आहेत. यासाठीच महाराष्ट्र राज्यामध्ये रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, इंदिरा आवास योजना आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेअंतर्गत गोरगरीब ब जनतेला घरी बांधून दिली जात आहेत.

या सर्व योजनांचे एकच उद्देश आहे की समाजातील शेवटच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या गोरगरिबाला घरकुल योजनेचा फायदा मिळावा व आता याच योजनेअंतर्गत हजारो घरकुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हे घरकुले मंजूर झाले आहेत आणि याचा लाभ कोणाला सर्वाधिक मिळणार आहे चला तर मग सविस्तर रित्या आजच्या लेखात जाणून घेऊया.

घरकुल वितरणासाठी नवीन योजना.

GHARKUL YOJANA राज्य शासनाच्या बहुजन व कल्याण विकास विभागाने राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती अंतर्गत ही योजना राबवली जात आहे.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

या जिल्ह्यातील घरकुल प्रस्ताव मंजूर.

नुकतीच सुरू झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी घरकुल मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावांची पडताळणी करून आता यास मंजुरी दिली आहे.GHARKUL YOJANA.

या जिल्ह्याला हजारो घरकुल मंजूर.

परभणी जिल्ह्यातील स्थानिक समितीने प्रशासनाकडे जिल्ह्यातील घरकुलांसाठी पाठपुरावा केला होता. वयात प्रस्तावाला मान्यता देऊन परभणी जिल्ह्यासाठी 3683 वैयक्तिक घर फुले मंजूर करण्यात आली आहेत आणि याचा पहिला हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली ; कापसाला विक्रमी भाव मिळण्याचे तज्ञांचे अंदाज..!

घरकुलांसाठी 46 कोटी रुपये निधी मंजूर.

GHARKUL YOJANA परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या या घरकुलांचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासनाने 46 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. वया घरकुलांच्या कामाला वेग देण्यासाठी आणखीन आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देखील राज्य शासनाने दिली.

रकमेत वाढ करण्याची मागणी.

वाढती महागाई पाहता घरकुल योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम घर बांधण्यासाठी अपुरी पडत आहे. सध्या वाळू लोखंड सिमेंट यांचे दर पाहता राज्य शासनाच्या एक लाख वीस हजार रुपये या अनुदानामध्ये घर बांधणे अशक्य आहे त्यामुळे राज्यांमधील घरकुल लाभार्थ्यांकडून या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी सतत करण्यात येते.GHARKUL YOJANA.

Leave a Comment