शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाचे शेतकऱ्यांसाठी 25 धडाकेबाज निर्णय, व निधी जाहीर. Government Decision Today

WhatsApp Group Join Now

Government Decision Today नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशांमध्ये जाहीर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णयाचा धुमधडाका लावला आहे. काल राज्य शासनाने एकाच वेळेस 25 धडाकेबाज शासन निर्णय जाहीर केले ज्यामुळे राज्यातील सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या शासन निर्णयाअंतर्गत कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून याचे वितरण देखील तात्काळ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर मग ते कोणते शासन निर्णय आहेत आणि याचा तुम्हाला काय फायदा होईल चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया.

१) शेतकऱ्यांसाठी AIIB बँकेकडून कर्जाची तरतूद.

पारेषण विरहित सौर कृषी पंप व पारंपारिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जेकरणाचे संलग्न योजना राबवण्यासाठी एआयआयबी बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख पारिषण विरहित सौर कृषी पंप महावितरण द्वारे विस्थापित करण्यात येणार आहेत.
यासाठी लागणारी रक्कम एआयआयबी बँक करून कर्ज स्वरूपात घेऊन त्याचे पुढील 2027 पर्यंत परतफेड करण्यात येणार आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! किराणा दुकान, रिक्षा व्यवसाय व इतर व्यवसायासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत..!

2) राज्यात नवीन 23 हजार किलोमीटर रस्ते बांधणार.

महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नवीन 23 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुढील 2024 ते 2025 या वर्षामध्ये दहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
तर उर्वरित 13 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते 2025-26 ते 2026-27 या वर्षांमध्ये अनुक्रमे 6500 किलोमीटर याप्रमाणे पूर्ण करण्यात येतील.Government Decision Today

3) मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता.

खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन प्रकल्प मार्गी लागला आहे व यास काल मान्यता देण्यात आली.
या योजनेमुळे तालुक्यातील 17 हजार १६७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, ज्यामुळे तालुक्यातील 35 गावांना याचा फायदा होईल.
योजनेसाठी लागणाऱ्या 697 कोटी ७१ लाख रुपये एवढ्या निधीस कालच्या मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आचारसंहितेच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासनाचे निर्णय, पहा आजचे मंत्रिमंडळ निर्णय..!

4) आशा सेविकांच्या मानधनात वाढ.

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला.
अशा सेविकांना हे वाढीव मानधनाची रक्कम नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे.
अशा स्वयंसेविकांना वाढीव मानधन देण्यासाठी राज्य शासनाने कालच्या मंत्रिमंडळ निर्णय मध्ये भरीव निधी देखील जाहीर केला आहे.

5) मुर्तीजापुर साठवण तलाव दुरुस्तीसाठी निधी जाहीर.

अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापुर तालुक्यातील वडगाव साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निधी जाहीर करण्यात आला आहे.
या तलावाच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी 32 लाख रुपये एवढा निधी अपेक्षित आहे.Government Decision Today
या तलावाची क्षमता 880 स.घ.मी असून यामुळे अकोला जिल्ह्यातील 125 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Leave a Comment