मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीमध्ये ; आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका. Government Modi New Decision.

WhatsApp Group Join Now

Government Modi New Decision. संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. व या आचारसंहिता मध्ये राजकीय प्रचार, प्रसार व इतर प्रशासकीय कामांना बंदी असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारने घेतलेल्या एका छोट्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या आचारसंहितेमध्ये मोठा फटका बसत आहे. व यामुळे शेतकऱ्यांचे सध्या नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून मोदी सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्यामुळे या गोण्या आचारसंहितेमध्ये विक्री करण्यास बंदी आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी रासायनिक खते खरेदी करता येत नाहीयेत. नरेंद्र मोदी यांच्या केवळ एका फोटोमुळे देशातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची खरेदी करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

काय आहेत आचारसंहितेचे नियम.

देशात कोणत्याही प्रकारची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते व या आचारसंहितेदरम्यान कोणत्याही राजकीय नेत्यांचे छायाचित्र किंवा मतदारांवर प्रभाव पडेल अशा कोणत्याही वस्तूंवर राजकीय मजकूर असल्यास त्यावर आचारसंहिता दरम्यान स्टिकर लावून त्याची खरेदी किंवा विक्री करावी लागते. व याच नियमा अंतर्गत रासायनिक खतांवरील मोदीजींच्या फोटोमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

रासायनिक खताबाबतचा मोदी सरकारचा नवीन निर्णय.

गेल्या वर्षीपासून देशातील सर्व रासायनिक कंपन्यांना नवीन निर्णयानुसार “भारत” या नावाखाली सर्व प्रकारचे रासायनिक खते विक्री करण्याचे आदेश केंद्र सरकारने जाहीर केले. वयाचा आदेशानुसार सर्व प्रकारच्या रासायनिक खतांवर नरेंद्र मोदीजींचे छायाचित्र लावण्यात आले.Government Modi New Decision.

रासायनिक दुकानदार मोठ्या पेचामध्ये.

आयोगाने जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाहीर केलेल्या पत्रानुसार कोणत्याही राजकीय व राजकीय उमेदवाराचा मजकूर असलेल्या वस्तू स्टिकर लावून खरेदी व विक्री कराव्यात असा आदेश जाहीर केला आहे. तसेच विना स्टिकर खरेदी विक्री होत असल्यास संबंधित दुकानावर कारवाई करण्याचे आदेश या अंतर्गत जाहीर करण्यात आल्यामुळे रासायनिक दुकानदारासमोर मोठा पेज निर्माण झाला आहे.Government Modi New Decision.

Leave a Comment