Harbhara market rates हरभऱ्याने ६५०० रुपयांचा पल्ला गाठला ; या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळतोय सर्वोच्च भाव.

WhatsApp Group Join Now

Harbhara market rates राज्यात यावर्षी प्रजन्यमान कमी राहिले व हंगामाच्या सुरुवातीला पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील प्रमुख पिके जसे कापूस सोयाबीन व तूर यांच्या उत्पन्नात फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांकडे लक्ष केंद्रित केले होते. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा यांसारख्या पिकांना प्राधान्य दिले. परंतु रब्बी हंगामामध्ये पिकांना देण्यासाठी पाण्याची टंचाई व अधून मधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न देखील घटले आहे. यात राज्यात हरभरा या पिकांचा पेरा कमी झाला असून नवीन हरभऱ्याला सध्या बाजार समितीमध्ये सर्वोच्च भाव पाहायला मिळत आहे.

बाजारात नवीन हरभऱ्याची आवक.

Harbhara market rates राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक होत आहे व नवीन हरभऱ्याला 5600 प्रतिक्विंटल ते 5900 प्रतिक्विंटलपर्यंत भाव पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर स्थिर असून सोयाबीनच्या दरात मात्र काहीच सुधारणा आढळून येत नाहीये.

हे पण वाचा :- यावर्षी गहू करणार मालामाल ; बाजार समित्यांमध्ये गव्हाला विक्रमी भाव..!

राज्यात हरभरा पिकाचा पेरा वाढला.

रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा या पिकाचा समावेश होतो. हरभरा ज्वारी या पिकांना गव्हाच्या तुलनेमध्ये कमी पाणी लागते व हरभरा कमी पाण्यावर तग धरून येऊ शकतो यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू किंवा उन्हाळी बाजरी पेक्षा हरभरा या पिकाला पसंती दिली आहे. त्यामुळे राज्यात गव्हाचा पेरा कमी होऊन हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले आहे.Harbhara market rates.

तुरीचे भाव 10500 रुपयांवर थांबले.

राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीन व कापूस यांची दर दबावात होते परंतु तूर मात्र सुसाट धावत होते. राज्यात तुरीचे क्षेत्र घटनेतून शेतकरी बाजारात तुरीची आवक कमी करत आहेत व तुरीची टप्प्याटप्प्याने विक्री करत असल्यामुळे तुरीच्या घरामध्ये बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढ पाहायला मिळाले. सध्या हीच दूर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे व मागील तीन दिवसापासून तुरीच्या घरामध्ये याच टप्प्यावर स्थिरता पहायला मिळत आहे.Harbhara market rates.

हे पण वाचा :- कांदा निर्यातीची धरसोड थांबेना ; केंद्र सरकार करणार ५४ हजार 760 टन कांदा निर्यात..!
राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील हरभऱ्याचे आजचे भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर
राहुरी 344 5600 5900 6100
उदगीर  422 5744 5865 6211
हिंगोली  511 5472 5855 5987
रिसोड़  323 4902 5677 5877
नवापुर  544 5876 5989 6322
रहाता  1233 5422 5977 6100
पुलगांव 611 6211 6453 6233
जलगांव  1244 6111 6288 6149

Leave a Comment