राज्यात खरोखरच पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडणार का? कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व काय आहे हवामान अंदाज. Hawaman Andaz Maharashtra.

WhatsApp Group Join Now

Hawaman Andaz Maharashtra. राज्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भातील जिल्ह्यांना झाला. ज्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका व हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

तसेच पुन्हा एकदा मागील दोन दिवसापासून बातम्यांमध्ये व काही खाजगी मीडिया रिपोर्ट द्वारे राज्यात पुढील चार दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि याच चर्चित बातमीवर राज्याचे निवृत्त हवामान तज्ञ व भारतीय हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाहीर केले आहे ज्या अंतर्गत राज्यात पुढील चार दिवस हवामान कसे राहील व कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल याबद्दलची सविस्तर माहिती जाहीर केली आहे.

काय आहे अवकाळी पावसाबद्दलची सत्य परिस्थिती.

राज्यात सध्या कडक उन्हाचा चटका पडला आहे. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार अशा समोर येत असलेल्या बातम्यांवर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले की, राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही केवळ विदर्भातील तुरळकच जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

📢 हे पण वाचा :- अग्रीम पिकविमा टप्पा दोनच्या वितरणाला सुरुवात, या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम जमा झाल्याचे मेसेज आले..!

या जिल्ह्यांमध्ये राहणार ढगाळ वातावरण.

Hawaman Andaz Maharashtra. भारतीय हवामान विभागाच्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये 16 मार्च ते 20 मार्च च्या काळामध्ये विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शनिवार ते बुधवार या चार दिवसाच्या काळामध्ये केवळ ढगाळ वातावरण राहील व हवामानात थोडासा दमटपणा पाहायला मिळेल.

या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस.

राज्यात विदर्भातील यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली व नागपूर या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागासह राज्यातील प्रख्यात हवामान तज्ञ पंजाब डक यांनी देखील वर्तवला आहे.

📢 हे पण वाचा :- दुधाच्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी असा दाखल करा प्रस्ताव, तरच मिळेल अनुदान..!

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये.

राज्यातील केवळ विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे काढणे व मळणी करण्यासाठी घाबरू नये. कारण मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.Hawaman Andaz Maharashtra.

मार्च महिन्यामध्ये कसे राहील वातावरण.

राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा हंगाम अजून संपलेला नाही परंतु अल निनोचे वर्षे तसेच मार्च महिन्यामध्ये कमी पर्जन्यमानाची शक्यता आणि उत्तर भारतामध्ये उद्भवत असलेली थंडी, हिमवर्षाव व पाऊस यामुळे राज्यात तापमानात सरासरी 2° वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment