KANDA BAJARBHAV निर्यात बंदीच्या अफवेमुळे कांद्याचे भाव घसरले ; दरात प्रतिक्विंटल 1000 रुपयांची घसरण.

WhatsApp Group Join Now

KANDA BAJARBHAV देशातील प्रख्यात न्यूज चैनल ने व वर्तमानपत्राद्वारे केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेली निर्यात बंदी हटवली असल्याच्या बातम्या प्रसार होत होत्या याचाच परिणाम दोन ते तीन दिवस बाजार समितीमध्ये कांद्याच्या घरात सुधारणा आढळून आली. परंतु निर्यात बंदी हटवली ही अफवा असल्यामुळे पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे.

कांद्याच्या दरात मोठी घसरण.

KANDA BAJARBHAV केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली या अपडेट मुळे सोमवारी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 1500 रुपये प्रति क्विंटल ते 2700 रुपये परत एकदा दरम्यान होते परंतु बुधवारी समोर आलेल्या बातम्यांद्वारे निर्यात बंदी कायम असल्याने कांद्याच्या दरात 1000 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत घसरण झाली.

हे पण वाचा :- ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान..!

निर्यात बंदीच्या अफवेचा बाजारावर परिणाम.

कांद्याची देशा अंतर्गत असलेली निर्यात बंदी मागे घेतली या अफवांमुळे कांद्याचे बाजार वधारले होते. सोमवारी नेवासा तालुक्यातील घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2500 ते 2700 प्रतिक्विंटल पर्यंत कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला तोच कांदा बुधवारी 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.KANDA BAJARBHAV.

एकाच दिवसात चारशे रुपयाची घसरण.

कांदा निर्यात बंदी हटवली ही अफवा आहे असे स्पष्ट झाल्यास वाढलेले कांद्याचे दर पुन्हा एकदा खाली आले. राज्यातील बाजार समिती एका दिवसात कांद्याचे दर चारशे रुपये पर्यंत कमी झाले होते. लासलगाव च्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल ने विक्री होत असलेला कांदा 1600 ते 2100 रुपये प्रतिक्विंटल ने बुधवारी विक्री होत आहे.

हे पण वाचा :- अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.

KANDA BAJARBHAV कांद्यावरील निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर, राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांकडून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देखील सरकारला देण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी संघटनेने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे.

आजचे बाजार समित्यांमधिल कांद्याचे बाजारभाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अकलूज  125 1500 2010 1600
कोल्हापुर  2798 900 2000 1800
छत्रपति संभाजीनगर  940 500 1600 1300
मुंबई  7567 1500 2100 1400
सातारा  187 900 1500 1200
हिंगना  150 800 1700 1288

 

Leave a Comment