Kanyadan Yojana Maharashtra खुशखबर..! लग्न सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून लाखोंचे अनुदान , येथे पहा स्विस्तर अपडेट.

WhatsApp Group Join Now

Kanyadan Yojana Maharashtra लग्न सोहळ्यावर करण्यात येणाऱ्या अमानुष खर्चावर आळा घालण्यासाठी व यामुळे वधू वर कुटुंबाला कर्जबाजारी होण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यामध्ये एक महत्त्वकांक्षी योजना राबवली जात आहे. ज्यामुळे लग्न सोहळ्यात होणाऱ्या अनुचित प्रथांना देखील आळा घातला जाईल.

तर मग राज्य शासनाने कोणत्या नवीन योजनेची घोषणा केली आहे व या योजनेअंतर्गत वधू-वरांना लग्न सोहळ्यासाठी किती रुपयांचे अनुदान दिले जाईल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर ची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे कन्यादान अनुदान योजना.

Kanyadan Yojana Maharashtra महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील कुटुंबाला मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य पुरवण्याकरिता राज्यात कन्यादान योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळे राबवणाऱ्या संस्थांना आणि मागासवर्गीय विवाहित दांपत्यांना विवाहाचा सर्व खर्च भागवण्यासाठी या योजेनेअंतर्गत अनुदान दिले जात आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! या जिल्ह्याला अवकाळी मदतीसाठी 206 कोटी रुपये मंजूर, तुमचे बँक खाते तपासा. कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..!

आता विवाह सोहळ्यासाठी मिळणार अनुदान.

या महागाईच्या काळामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील विवाह सोहळे कमी खर्चामध्ये व्हावे, व मागासवर्गीय कुटुंबांचा विवाह सोहळ्यावरील खर्च कमी होऊन तो खर्च नवविवाहित दांपत्यांच्या संसारात उपयोगी यावा यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.

फक्त यांच्यासाठी राबवली जाते ही योजना.

राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबासाठी स्वंयसेवी संस्था अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी वैवाहिक दांपत्यांसाठी ही योजना राबवली जाते.Kanyadan Yojana Maharashtra.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बाजारात कापसाची मागणी वाढली, पहा आजचे कापुस बाजारभाव..!

विवाह अनुदानासाठीच्या शर्ती व अटी.

योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या वधू-वरांपैकी दोघेही किंवा एक जण हे अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्गातील असायला हवे.
वधू आणि वर दोन्हीही महाराष्ट्र मधील स्थायी नागरिक असायला हवेत.
योजनेचा लाभ घेऊन निश्चित असणाऱ्या वराचे वय 21 वर्षे पूर्ण तर वधूचे 18 वर्षे पूर्ण असायला हवे.
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी दहा दांपत्ये म्हणजे 20 वधू-वर असणे आवश्यक आहे.Kanyadan Yojana Maharashtra.

Leave a Comment